मराठी भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येकाची. - प्रा. डॉ. शंकर विभुते


नांदेड( प्रतिनिधी)27फेब्रुवारी 2024

मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे,ती जपली पाहिजे, मराठी माणूस मोठा झाला की भाषा आपोआप मोठी होते.आपली भाषा समृद्ध करण्याची आपली सर्वांची प्रत्येकाची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ शंकर विभुते यांनी केले.

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित कुसुमताई चव्हाण डी.एड.कॉलेज व श्री.शारदा भवन अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्य स्मरण निमित्ताने डॉ . शंकरराव चव्हाण विचारमाला व मराठी भाषा गौरवदिन निमित्ताने ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

साहित्यिक डॉ.विभुते म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांचे आचार आणि विचार जगण्याला बळ देतात.प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि वक्तशीरपणा या गोष्टी आपण शिकायला हवं, असं ते यावेळी म्हणाले. मराठी भाषा गौरवदिन निमित्ताने मराठी भाषेतील गंमती जमती सांगून कुसुमाग्रजांच्या साहित्याची ओळख यावेळी करून दिली.

भाषणाच्या शेवटी सादर केलेल्या त्यांच्या मा.आमदार गणपतराव या विनोदी कथेला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षा महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.ए.आर.राऊत यांनी अध्यक्षीय भाषणात श्रद्धेय डॉ शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या त्यागामुळे आपला परिसर हिरवागार झाला.पाण्याची सोय झाली.हे ऋण आपण विसरू शकत नाही.असे त्या वेळी म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डाॅ.आर. डब्ल्यू.यांनी केले. डाॅ. शंकरराव चव्हाण: जीवन व कार्य बहुपर्यायी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती(26/2/2024) यामध्ये भुमिका भालेराव ( प्रथम क्रंमाक), समीक्षा गोकुळे ( द्वितीय) , धनश्री आढाव व श्याम पुयड( तृतीय) तर घोडके सुरज( उत्तेजनपर) बक्षीस देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. 'साहित्य परिचय' नाटीका सुप्रिया गवते,चेतना अञे, श्रेया काठेवाडे, भाग्यश्री चव्हाण, ऐश्वर्या नरवाडे, चंदना कल्यानकर, नंदिनी राठोड, संपदा सुफलकर डी.एल.एड.प्रथम यांनी सादरीकरण केली.प्रश्नमंजुषा मराठी साहित्यावर शितल आगलावे यांनी सादरीकरण केली. तसेच छाञाध्यापिका भुमिका भालेराव यांनी लावणी नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाञाध्यापिका भुमिका भालेराव व धनश्री आढाव यांनी केले.तर आभार छाञाध्यापिका धनश्री आढाव यांनी मानले .


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. लोंखडे एन. पी., प्रा. म.अल्ताफ, प्रा. डी.व्ही.चिद्दरवार, प्रा. यु.जी.सरोदे, प्रा. राम कदम आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज