प्रेमिलाबाई अनंतराव नागापूरकर यांचे दुःखद निधन

विनायकनगर मराठा हॉटेल जवळील ज्येष्ठ नागरिक प्रेमिलाबाई अनंतराव नागापूरकर वय 95 रात्री गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्री दीडच्या नंतर दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता गोवर्धनघाट येथील शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात रत्नाकर, संजय, सा. दैनिक नांदेडवार्ता मुख्य संपादक तथा कामगार नेते, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रदीप नागापूरकर ,ही तीन मुले, कृपा जोशी नागापुरकर यांच्या त्या मातोश्री होत, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार होता. प्रख्यात कामगार नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत अनंतराव नागापूरकर यांच्या त्या सहचरणी होत्या. दिवंगत अनंतराव नागपूरकर यांच्या संघर्षमय जीवनाला त्यांनी खंबीर साथ दिली.

ग्लोबल मराठवाडा च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 

टिप्पण्या