अब मान जावो सै़य्या,परु मैं तेरे पैंया..! यशस्वी सरपोतदार यांचा जोरकस दादरा.

नांदेड दि.२७(प्रतिनिधी)-संगीत शंकरदरबारच्या अंतिम सत्रातील पहिली मैफल ग्वाल्हेर घराण्याच्या उदयोन्मुख गायिका यशस्वी सरपोतदार यांची झाली.जेष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांचे शिष्यत्व लाभलेल्या या गायिकेच्या गायनातील जोरकसपणे,सादरीकरणाची पद्धती जाणकारांना देखील प्रभावित करणारी होती.त्यांच्या गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

यशस्वीताईंनी सादर केलेला 'भुप' विलक्षण सुरेख आखीव-रेखीव स्वरूपाचा होता. सादरीकरण 'प्रझेन्टेबल' कसे असावे याचा जणू वास्तुपाठच होता."जबसे तुम्ही संग लागली प्रित' या तिनतालात तबला वादक रोहित मुजूमदार व हार्मोनियमवादक अभिषेक शिनकर यांच्या सोबतची जुगलबंदी टाळ्या मिळवून गेली.त्यानंतरचा तराना देखील त्याच ताकदीचा होता.

'खमाज' रागामध्ये प्रस्तुत केलेला

'अब मान जावो सै़य्या...परु मैं तेरे पैंया..' दादरा उपस्थितांना सुखावून गेला.

प्रारंभी सरपोतदार यांचे आतिथ्य विद्याताई शेंदारकर यांनी केले.कलावंतांचा परिचय व संचालन प्रा.विश्वाधर देशमुख यांनी केले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज