नांदेड ग्रामीण पोलीसावर जिवे मारण्याचे हल्ला करणारे आरोपीतांन कडून एक गावठी पिस्टल तीन काडतुस व चार लोखंडी खंजरसह ताब्यात..

 नवीन नांदेड:- ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व गावठी पिस्टल बाळगणारे आरोपीतींचा शोध घेण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार गुप्त माहिती वरून वसंतराव नाईक महाविद्यालय सिडको जुनी इमारत येथे एका व्यक्तीच्या खुन करण्याचा उददे्शाने थांबले असल्याची माहिती वरून सदर ठिकाणी छापा मारला असता पाच आरोपी कडुन एक पिस्टल व चार खंजर चाकु शस्त्र पोलीसांना मिळुन आले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी वरीष्ठ अधिकारी यांनी अधिकारी व पोलीस अंमलदार पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. 

    पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण जि. नांदेड हद्दित अवैध गावठी पिस्टल बाळगणारे आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन अटक करण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड,अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी योग्यत्या सुचना देवुन कार्यवाही करण्याबाबत आदेश दिला असता पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील प्रभारी अधिकारी एन.एस.आयलाने, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक महेश अशोकराव कोरे, पोलीस अंमलदार प्रभाकर मलदोडे, संतोष जाधव, विक्रम वाकोडे, शेख सत्तार मगदूम, अर्जुन मुंडे, संतोष बेल्लुरोड, माधव माने, श्रीराम दासरे, चंद्रकांत स्वामी, ज्ञानेश्वर कलंदर, शिवानंद तेजबंद असे दिनांक 24फेब्रुवारी 24 रोजी रात्री 9 वाजता पो.स्टे. हद्दित रवाना होवुन पेट्रोलिग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार,केसरबाई प्रदिप सरपे याचे घरासमोर नाईक कॉलेज जवळ सिडको, नांदेड, येथे काही इसम एका व्यक्तीचा खुन करण्याचे उद्देशाने गावठी पिस्टल व लोखंडी खंजर बाळगून थांबले आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाली, सदर ठिकाणी जावुन छापा मारला असता तेथे खालील आरोपी मिळुन आले. माधव रामदास गायकवाड वय 32 वर्ष व्यवसाय मजुरी रा.दिक्षानगर, बळीरामपुर ता.जि.नांदेड,अजय उर्फ लड्या भगवान जोगदंड वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी रा.ND-41 राहुलनगर सिडको, नांदेड, विशाल रमेश शितळे वय 23 वर्ष व्यवसाय मजुरी रा. विजयनगर, सिडको, नांदेड, व एक विधीसंघर्ष बालक, व आकाश रमेश शितळे वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा. विजयनगर सिडको, नांदेड यांना ताब्यात घेतले ,यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे कडे खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला.

 पाचही आरोपी कडे धारदार शस्त्र व एक लोखंडी गावठी पिस्टल ज्यास ट्रेगर व ट्रेगरगार्ड असुन, ज्याचे प्रीपवर प्लास्टीकच्या ब्राऊन रंगाची दोन्ही बाजुस पटया असलेली व आतमध्ये एक मॅग्झीन व मॅग्झीन काढुन पाहणी केली असता ज्यामध्ये तीन काडतुस लोड असलेली असे एकुण 33,500/- रुपयेचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

वरील मुद्देमाल मिळुन आला व पोलीसावर जिवे मारण्याचे उद्देशाने हामला केल्याने पो.स्टे.नांदेड ग्रा. गु.र.नं. 150/2024 कलम 307, 353,143,147,148, 149 'भा.दं.वी. सह कलम 3/25,4/25 शस्त्र अधिनियम, सह कलम 135 म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनात सपोनी सचिन गढ़वे पो.स्टे.नांदेड ग्रामीण हे करीत आहेत.

जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत व केलेल्या कामगिरी बाबत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पथकातील टिमचे श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड,अबिनाश कुमार,अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव : समर्पित प्राध्यापिका*
इमेज
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगणारी..गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या: हर्षवर्धन सपकाळ
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज
बल्लाळेश्वर पतसंस्थेच्या लाडकी बहीण ठेव योजनेचा सांगता सोहळा संपन्न*
इमेज