नांदेड. महान त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, दक्षिण नांदेडच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी नांदेडच्या 'सिडको' परिसरातील जेतवन बुद्ध विहाराच्या प्रांगणात सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे यांचा भीम-रमाई गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडी दक्षिण नांदेडच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त नांदेडच्या 'सिडको' परिसरातील गुरूवार बाजार मैदानातील 'जेतवन' बुद्ध विहाराच्या प्रांगणात बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध गायिका तथा 'मला तुझ्या रक्तामधला भीम पाहु दे' फेम- भाग्यश्री इंगळे यांचा भीम-रमाई गीतांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूख अहेमद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण नांदेडचे जिल्हाध्यक्ष पी. एम. वाघमारे यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून बसव ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष अविनाश भोसीकर, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी व नागोराव पांचाळ यांच्यासह मराठवाडा अध्यक्ष अशोक पाटील हिंगे, डॉ. संघरत्न कुऱ्हे, ॲड. यशवंत चावरे, राजेश हत्तीहंबीरे, वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले आणि माधवदादा जमदाडे यांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, जिल्हा महासचिव श्याम कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष धीरज हाके, विक्की वाघमारे, महानगराध्यक्ष आयुब खान, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दैवशाला पांचाळ, निरंजना आवटे, रेखाताई पंडित, चंद्रकला चापलकर, संजना गायकवाड, जावेद हाश्मी, तालुकाध्यक्ष विनायक गजभारे, युवा आघाडीचे महानगराध्यक्ष गोपालसिंग टाक व धनेगाव ग्रा.पं.चे माजी सरपंच तातेराव ढवळे आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास नवीन नांदेड परिसरातील बहुजन समाज बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहून गायिका भाग्यश्री इंगळे यांच्या समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजक तथा वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड व रमाई जयंती महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष अनिल बेरजे, महानगर सल्लागार साहेबराव भंडारे, महासचिव अमृत नरंगलकर, नंदकुमार गच्चे, प्रकाश झडते, केशव कांबळे, श्यामराव कांबळे, पंडित सोनकांबळे, सिध्दार्थ पवार, शाहीर गौतम पवार, बापूराव जमदाडे, गौतम पानपट्टे, क्रांतीकुमार पंडित, व्यंकट इंगळे, मधुकर गायकवाड व त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा