नांदेड:(दि.८ फेब्रुवारी २०२४)
संपूर्ण देशात अंधार आणि निराशा पसरलेल्या काळामध्ये मानवतेच्या रक्षणासाठी हातात कृपाण उचलणारे व प्रखर राष्ट्र प्रेमाने भारावलेले वीर योद्धे श्री गुरु गोविंद सिंहजी होते. श्री गुरु गोविंद सिंहजी यांनी सोळा लढाया लढल्या आणि जिंकल्या;परंतु आपले कुठलेही साम्राज्य निर्माण केले नाही, तर संपूर्ण जगाला मानवतेच्या रक्षणाचा संदेश दिला; असे प्रतिपादन हुजूर साहेब आय.टी.आय., नांदेड येथील प्राचार्य श्री गुरुबचनसिंह शिलेदार यांनी केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेत 'श्री गुरु गोविंद सिंह यांचे जीवन आणि कार्य' या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे होत्या.याप्रसंगी विचारपिठावर यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप पाईकराव उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गुरुगोविंद सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना श्री गुरुबचनसिंह शिलेदार म्हणाले की, श्री गुरुगोविंद सिंह यांनी देहधारी गुरुची परंपरा समाप्त करून 'गुरु मानियो ग्रंथ 'चा संदेश देत श्री गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथास गुरुस्थानी विराजमान केले, तसेच खालसा पंथाची स्थापना करून विचार आणि आचाराचे पावित्र्य जपण्यासाठी पाच क कारांचा उपदेश दिला.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे म्हणाल्या की, श्री गुरुगोविंद सिंहांनी खालसा पंथाच्या माध्यमातून दिलेल्या समानता, श्रमनिष्ठा आणि सेवाभावाच्या संदेशाची संपूर्ण भारतीय समाजाला आज नितांत आवश्यकता आहे.
प्रारंभी प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी केले तर आभार डॉ. साईनाथ शाहू यांनी मानले.
याप्रसंगी यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समिती सदस्य प्रा.गौतम दुथडे, डॉ.कैलास वडजे, प्रा.शांतूलाल मावसकर, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, डॉ.संगीता शिंदे, (ढेंगळे), प्रा.राजश्री जी.भोपाळे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.व्ही.सी.बोरकर, डॉ.नीरज पांडे, डॉ.सुभाष जुन्ने,डॉ.धनराज भुरे,डॉ.संजय ननवरे, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.एस.एम.दुर्राणी, डॉ.रामराज गावंडे, डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ.अजय मुठे, डॉ.वीरभद्र स्वामी, आनंदा शिंदे आदी प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

addComments
टिप्पणी पोस्ट करा