आज नांदेड भाजपा लोकसभा बूथ कार्यकर्ता संमेलन : मध्यप्रदेश उपमुख्यमंत्री जगदीश देवडा करणार मार्गदर्शन

 


नांदेड: येणारी लोकसभा अधिक ताकतीने जिंकण्याच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्वच बूथ केंद्रावर भाजपा अधिक सक्षम करण्याचे अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सहयोग कॅम्पस विष्णुपुरी येथे दुपारी 2.30 वाजता नांदेड लोकसभा बूथ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे . बुथ कार्यकर्ता संमेलनास मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा हे मार्गदर्शन करणारा असून यावेळी खा. अशोकराव चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. डॉ. अजित गोपछडे, भाजपाचे विभागीय संघटन मंत्री संजयजी कोडगे,आ. राम पाटील रातोळीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. राजेश पवार , भाजपाचे प्रदेश सचिव देविदासभाऊ राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पुन्हा एकदा भाजपाची लाट निर्माण झाली आहे. ' अबकी बार ४०० पार ' असा नारा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिला आहे. या अनुषंगाने राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपाचे गाव पातळीवर आणि बुथ केंद्रावरही बांधणी सुरू आहे .याच अनुषंगाने नांदेड लोकसभा मतदारसंघातील देगलूर- बीलोली ,मुखेड ,नायगाव, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर आणि भोकर या विधानसभा क्षेत्रातील बूथ अध्यक्ष , शक्ति केंद्रप्रमुख यांचे नांदेड लोकसभा बूथ कार्यकर्ता संमेलन आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता सहयोग कॅम्पस, विष्णुपुरी नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे . बूथ कार्यकर्ता संमेलनास मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा हे मार्गदर्शन करणार आहेत.

आयोजित बूथ कार्यकर्ता संमेलनास नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्वच बूथ अध्यक्षांनी आणि शक्तीकेंद्र प्रमुखाने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे , महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते , उत्तर जिल्हा अध्यक्ष एडवोकेट किशोर देशमुख यांनी केले आहे.

टिप्पण्या