नवीन नांदेड. दि.१.(प्रतिनीधी)
श्री.मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ता. कंधार येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा सिडको नवीन नांदेड भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुकुंद बोकारे यांचा वाढदिवस आज दि.१ फेब्रुवारी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
नांदेडकर पोलीस अकॅडमी तर्फे
डॉ. रमेश नांदेडकर यांनी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थिनींना शालेय साहित्य तथा खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.
प्रा. शशिकांत हटकर यांच्या वतीने महात्मा गांधी निवासी अपंग विद्यालय सिडको येथे
दिव्यांग विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेले परीक्षेचे
पॅड वाटप करण्यात आले.
डॉ. ललिता शिंदे बोकारे यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड मनपाच्या माजी महापौर सौ.मंगलाताई निमकर, नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष सौ. कळसकर, सौ. धुळेकर
महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे, नांदेड शहर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विनोद
कांचनगिरे, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुदर्शन कांचनगिरे, नांदेड जिल्हा काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा महासचिव किशनराव रावणगावकर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भी.ना. गायकवाड, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळीची व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

addComments
टिप्पणी पोस्ट करा