नांदेड जिल्हा लवकरच भाजपमय होणार - अशोकराव चव्हाण
नांदेड प्रतिनिधी:- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश,शहर आणि जिल्हा कार्यकारिणीतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात आज सोमवारी ( दि.२७) जाहीररित्या प्रवेश केला आहे. त्यामध्ये चार माजी महिला महापौर, माजी जि.प.अध्यक्षा आणि अनेक माजी सभापती यांच्यासह असंख्य महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे प्रथमच नांदेडमध्ये आगमन होताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी जणू रिघ लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांनी भाजपात नुकताच प्रवेश केला तर आज सोमवारी ( दि.२७) काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश,शहर आणि जिल्हा कार्यकारिणीतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात आज सोमवारी ( दि.२७) जाहीररित्या प्रवेश केला. त्यामध्ये चार माजी महापौर, माजी जि.प.अध्यक्षा आणि माजी सभापती यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाजी नगरातील ' आनंद निलयम ' समोर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपात पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी आमदार अमरनाथ राजूरकर, हिंगोलीचे माजी आ. गजानन घुगे, रामराव वडकुते, भाजपा महिला आघाडीच्या श्रध्दाताई चव्हाण, धनश्रीताई देव, डॉ. शितलताई भालके, माजी महापौर मंगलाताई निमकर, माजी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर मंगलाताई निमकर, शैलजाताई किशोर स्वामी, मोहिनीताई विजय येवनकर, जयश्रीताई निलेश पावडे,माजी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेस प्रदेश चिटणीस सुमती व्याहळकर, छायाताई व्याहाळकर, प्रदेश सदस्या अनुजाताई तेहरा, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविताताई कळसकर, जिल्हा सचिव रेखाताई चव्हाण, शहराध्यक्षा प्रा. ललिता शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सीमाताई देशमुख, वसुधाताई तगडपल्ले,जयश्री यशवंतकर, संध्याताई अंबेकर, माजी सभापती अनिता इंगोले, संगिता पाटील डक, आशाताई पारवेकर, सुनिताताई रावत, वंदना जैस्वाल, शुभांगीताई देबडवार, रेखाताई कवशटवार, अनिता सूर्यवंशी, स्नेहप्रभा लोहगावकर, नविद खांद्री, छाया बिजवे, अनिता गज्जेवार,अरुणा पुरी, पार्वती होनराव, गंगाताई नांदेडकर, सुनिता राठोड, सुमनताई पवार, माजी नगरसेविका कविताताई मुळे, सविता बिरकले, सुनंदा पाटील, सुषमा थोरात, रजिया बेगम खान, समदानी , चंदा हळदे पाटील,अनिता राठोड, कांगठीकर, मंगलाताई स्वामी, रिमाताई रामगडीया, प्राचीताई कोरे, भारतीताई कोरे, जयश्रीताई तोडकरे, प्रणिता भरणे, मंगला स्वामी, बलजित कौर रामगडीया, वनमाला शिंदे, सुधाताई, पार्वतीताई यांच्यासह युवक काँग्रेसचे सचिव संजय गोटमुखे आणि त्यांच्या मित्रमंडळाने यावेळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या सर्वांचे भाजपाचे उपरणे पांघरून स्वागत केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन माजी महापौर मंगलाताई निमकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक विजय येवनकर, दुष्यंत सोनाळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट...
नांदेड जिल्हा लवकरच भाजपमय
होणार - अशोकराव चव्हाण
काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर यावेळी उपस्थित सर्वांचे स्वागत करून मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, माझे राजकीय करिअर घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि प्रत्येक निवडणुकीत अहोरात्र परिश्रम घेवून प्रचार करणाऱ्या या माझ्या महिला भगिनींनी ' जिथे तुम्ही, तिथे आम्ही ' हे घोषवाक्य देत आज जाहीर प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात भाजपला भक्कम पाठबळ मिळणार आहे. भाजपत प्रवेश केल्यानंतर पक्ष नेतृत्वाने अवघ्या ४८ तासात राज्यसभेवर बिनविरोध निवडून देवुन माझ्यावर विश्वास दाखवत अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी झालेल्या सत्कार सोहळ्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मला कधीही विसरू शकत नाही, अशा भावना व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेडची जागा निश्चितपणे निवडून आणणार, तसेच या पुढील काळ नव्या उमेदीचा असल्याचे नमूद करून मराठवाड्यासह नांदेड जिल्हा देखील लवकरच भाजपमय होणार असल्याचा विश्वास देखील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी भाजप महिला आघाडीच्या श्रध्दाताई चव्हाण म्हणाल्या की, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे नेतृत्व अशोकराव चव्हाण साहेब आता भाजपमध्ये आल्याने जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत होणार आहे. आज प्रवेश करणाऱ्या माजी महापौर आणि नगरसेवक यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने यापुढे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासासाठी नव्या जोमाने काम करू, असे सांगितले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा