नांदेड वार्ताहर दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेडच्या सायन्स महाविद्यालय संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई हे होते. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बोलतांना कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा इ एम खिल्लारे यांनी गाडगे महाराजांनी सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता यांचे धडे समाजात दिले. साधी राहणीमान असून शिक्षणावर त्यांनी भर दिले. समाज सुधारणेत गाडगेबाबांचे नाव आग्रणीय आहे असे विचार प्रस्तुत केले. अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांनी केले. बोलतांना म्हणाले की समाजातील अज्ञान, अंधविश्वास, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा, दूर करण्यासाठी संत गाडगेबाबांनी आपले आयुष्य कार्यात लावून दिले, व गाडगेबाबांची दहा सूत्री स्पष्ट करून अध्यक्षीय समारोप केले. कार्यक्रमाच्या संयोजिका उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी तसेच स्टॉप सेक्रेटरी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना संत म्हणजे ज्यांचा कधीच अंत होत नाही तो खरा संत. साधी राहणीमान व उच्च विचार असणारे कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते, समाज प्रबोधनकार, समाजातील माणसे जोडणारे व्यक्तिमत्व हे संत गाडगेबाबा होते. असे विचार व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाचे कार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमात प्राध्यापकांमध्ये प्रो डॉ डी आर मुंडे, प्रा एम आर मुळे, डॉ पी आर कुलकर्णी, डॉ यु एस पत्की, प्रा एस आर दूलेवाड, प्रा एस एफ गोरे, प्रा रायनी राजेश्वर राव, तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये दिलीप कापुरे, राजू गजभारे, व्ही जे सावने, एस एल जोशी, पी बी कदम, एम बी सारंगे, जी व्ही वाघमारे, सोनाली वाणी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आशुतोष घाटोळे, ऋषिकेश घाटोळे, सचिन सुपलकर, अभिजीत जाधव यांची यावेळी कार्यक्रमात उपस्थिती होती, कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून गाडगेबाबांना अभिवादन केले.
*संत गाडगेबाबा यांची जयंती सायन्स कॉलेज येथे संपन्न*
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा