महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून व्यावसायिकास मारहाण व शिवीगाळ करीत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे

 नांदेड वाघाळा महानगर पालिका अंतर्गत अतिक्रमण हटाव पथक कार्यान्वित केले असून छोटे-मोठे व्यवसायिक हे महानगरपालिकेस कर नियमित भरणा भरून व्यवसायिक रोडच्या फुटपाट च्या कडेला आपला छोटा मोठा व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत असताना अशा व्यवसायिकांना नाहक त्रास देत अतिक्रमण हटाव पथकाकडून शिवीगाळ व मारहाणी सारख्या घटना घडत असून सामान्य व्यवसायिक यांना व्यवसायासाठी त्रास होत असताना देखील तो देखीलसहन करीत असल्याचेही निवेदनात जहागीरदार यांनी नमूद केले आहे


 नांदेड शहरा मधील चौक, हबीब टॉकीज, मोंढा, देगलूर नाका, हिंगोली गेट, हिंगोली नाका, तरोडा नाका, भाग्यनगर, गुरुद्वारा,अशा अनेक शहरांमधील मुख्य ठिकाणी रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत असताना अशा ठिकाणी मात्र अतिक्रमण हटाव पथक फिरकत नसल्याचा आरोपही जहागीरदार यांनी केला आहे

नांदेड शहराच्या वरदळीच्या मुख्य रस्त्याच्या व्यवसायिकावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता वर्दळ नसलेल्या रस्त्यावरील व्यावसायिकांवर कारवाईच्या नावाखाली दडपशाही करीत असल्याचा आरोपही जहागीरदार यांनी केला आहे 

  महानगरपालिकेच्या पथकाकडून अरेरावीची भाषा करीत शिवीगाळ करून मारहाण करीत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशाराही जहागीरदार यांनी दिला आहे
टिप्पण्या