नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने केलेल्या विविध विकास कामांची आणि कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गाव चलो अभियानात भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी मुखेड येथे मुक्काम करून सर्वसामान्य नागरिक , पदाधिकारी आणि लाभार्थ्यांशी संवाद साधला . पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच या देशाचे तारक आहेत. त्यामुळे देशाच्या उज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करावयाचे आहे. त्यासाठी भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन हंबर्डे यांनी यावेळी केले .
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सध्या गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत राबविलेल्या विविध योजनांची माहिती त्या त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. शिवाय ज्या लाभार्थ्यांना एखाद्या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना आणि उपाय योजना करण्यात येत आहेत . केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या 18 योजनांची माहिती देण्यासाठी 18 तास काम केले जात आहे . या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे हे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मुखेड शहरात मुक्कामी होते. त्यांनी मुखेड शहरातील बुथ क्रमांक 170 वर दौरा केला. यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांशी संवाद साधून विविध शासकीय योजनांची माहिती दिली . भाजपा शहर सरचिटणीस विनोद दंडलवाड यांच्या घरी भेट देऊन महादेव मंदिरात त्यांनी दर्शन घेतले . त्यानंतर पत्रकार संघाचे चरणसिंह चौहान आणि सर्व पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला .
बुथ समितीची यावेळी हंबर्डे यांनी बैठक घेतली. प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी रुक्मीनबाई डांगे ,सुनंदा डांगे, विठ्ठल कलेवार या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांचा सत्कारही करण्यात आला. संघ परिवाराचे सत्यवान अण्णा गरुडकर, महेश मुक्कावार , दशरथ रोडगे यांचीही जिल्हाध्यक्ष हंबर्डे यांनी भेट घेऊन संवाद साधला. तर चंद्रकांत गरुडकर यांच्या गुरुदेव विद्या मंदिरात शाळेतील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा अंतर्गत संवाद साधला. भाजपा राजस्थानी सेलचे जिल्हा संयोजक तथा नगरसेवक जगदीश बियाणी यांची भेट घेऊन युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अनिकेत कांबळे यांच्या समवेत वस्ती भेट घेतली. विविध घटकातील व्यक्तींशी संपर्क साधला. त्या भागातील व्यापारी आणि कामगारांशी त्यांनी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी आयएमचे सचिव डॉ. कैलास पाटील यांच्या निवासस्थानी शहरातील डॉक्टरांची भेट घेतली. यावेळी डॉ. दिलीप पुंडे , डॉ. व्यंकट सुभेदार , डॉ. राम श्रीरामे , डॉ.उमेश पाटील यांच्यासह अनेक डॉक्टर्स उपस्थित होते . कारसेवक व्यंकटराव रामराव चिद्रावार यांचा डॉ. हंबर्डे यांनी सत्कार केला. शिवाय करण रोडगे यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन संवादही साधला.
माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार , शंकर पोतदार , अतुल देबडवार , दीपक देवापुरे यांच्या व्यापारी प्रतिष्ठान यांना भेट दिली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या लोकसभेत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचेच कमळ फुलवण्यासाठी कामाला लागा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.सोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. माधवराव पाटील उच्चेकर , विधानसभा विस्तारक किशोर चौहान, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड , दीपक मुक्कावार , राम पत्तेवार राजू घोडके , राजेश गजलवाड , व्यंकटराव जाधव , सुधीर चव्हाण , गोविंद घोगरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

addComments
टिप्पणी पोस्ट करा