श्री तुळजाभवानी जिनिंग संस्थेच्या हितासाठीच बि.एस.एन.एल. कंपनीशी करार केला होता. -----भास्करराव पाटील भिलवंडे
नायगाव प्रतिनिधी :(शेख आरीफ)
नरसी या जन्मभूमीचा सर्वांगीन विकास व्हावा या उदात्त हेतुनेच कै. भगवानराव पाटील भिलवंडे यांनी सन 1999 मध्ये बि.एस.एन.एल. चे टॉवर व टेलिफोन एक्स्चेंज उभारण्यासाठी श्री तुळजाभवानी जिनिंग संस्थेची 14 गुंठे जागा शासनाची परवानगी घेवुन 9 लक्ष 10 हजार रुपयात दिली होती पण 25 वर्षानंतरही बि.एस.एन.एल. ने या जागेची रक्कम दिली नसल्यामुळे या संस्थेचे संस्थापक चेअरमन माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांनी संचालक मंडळाने दिलेल्या अधिकारावरुन संस्थेच्या हितासाठीच बि.एस.एन.एल. कंपनीच्या अधिका-याबरोबर तडजोड करुन 17 लक्ष रुपये तातडीने जिनिंग संस्थेच्या खात्यात भरण्यात यावी असा करार केला त्यात कसलाही अपहार, गैरव्यवहार वा भ्रष्टाचाराचा प्रश्नच उद्भवत नाही केवळ लोकसभा निवडणूकीपुढे राजकीय हेतुने प्रेरीत होवुन भास्करराव पाटील खतगांवकर यांना बदनाम करण्याचा विरोधी पक्षाचा कुटील डाव आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील भिलवंडे यांनी केला आहे.
कलम 156 (3) खाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात खोट्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे असे माझे मत आहे कारण केंद्र शासनाची बि.एस.एन.एल. कंपनीचे अधिकारी व राज्यशासनाच्या सहकार विभागाच्या संचालक मंडळात झालेल्या करारात आजपर्यंत बि.एस.एन.एल. ने एक रुपया देखील संस्थेला दिला नसल्याचे लेखी पत्र बि.एस.एन.एल. च्या वरिष्ठ अधिका-यांनी पोलीस अधिका-यांना पाठविले आहे आणी औरंगाबाद खंडपिठाने भास्करराव पाटील खतगांवकर व बि.आर. कदम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे यावरुन हा गुन्हा केवळ राजकीय आकसापोटी दाखल केला गेल्याचेही भास्करराव भिलवंडे यांनी म्हटले आहे.
नरसी गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतुने आजच्या बाजार मुल्यानुसार दहा कोटी पेक्षा अधिक मुल्य असणारी जमीन कै. भगवानराव भिलवंडे पाटील यांनी शासकीय दुध शितकरण केंद्र, सहकारी तत्वावर जिनिंग, दत्तात्रय शिक्षण संस्था, दत्त मंदीर, बसस्थानक, पशुवैद्यकीय दवाखाना व अंगनवाडी, जि.प. शाळेसाठी दिली. श्री तुळजाभवानी जिनिंगचे संस्थापक चेअरमन माजी मंत्री मा. खा. भास्करराव पाटील खतगांवकर यांच्या सहकार्यामुळेच माझे वडील शेवटच्या श्वासापर्यंत या जिनिंगचे चेअरमन होते असेही भास्कर भिलवंडे म्हणाले.
भास्करराव पाटील खतगांवकरांनी 26 जानेवारी 1987 रोजी संस्थापक अध्यक्ष म्हणुन कार्यरत राहुन श्री तुळजाभवानी जिनिंग अॅन्ड प्रेसींगसह संस्थेची नरसी येथे मंजुरी मिळवुन घेतली. जिनांग, प्रेसींग उभारणीसाठी भागवानराव पाटील भिलवंडे यांनी स्वतःची शेतजमीन गट क्र.217 मधील 55 आर जमीन दि. 06/05/1987 रोजी दस्त क्र. 1640 नुसार केवळ 40 हजार 500 रु. विक्री नामा करुन दिली होती आणी विक्रीतुन आलेली रक्कम संस्थेच्याच शेअर्स खात्यात भरली. या 55 आर जमीनी बरोबरच अन्य तिन शेतक-यांच्या जमीनी याच दिवशी 4 एक्कर 3 गुंठे जमीन संस्थेने विकत घेतली ति रक्कम ही कै. भगवानराव भिलवंडे यांचेसह अन्य सभासदांनीही खारीचा वाटा शेअर्स रुपात दिला मात्र भास्करराव पाटील खतगांवकर यांनी देखील जमीन खरेदीसाठी मोठी रक्कम संस्थेच्या शेअर्सखाती दिली हे कदापी विसरता येणार नाही नाही.
कै. भगवानराव भिलवंडे पाटील व माजी खा. भास्करराव पाटील खतगांवकर यांची एकमेकावरील प्रेम निष्ठा नांदेड जिल्ह्यातीलराजकीय वर्तुळात परिचीत आहे म्हणुनच माझे वडील कै. भागवानराव पाटील हे शेवटच्या श्वासापर्यंत या संस्थेचे चेअरमन होत असेही भास्कर पाटील म्हणाले.
दि. 30/06/2016 रोजी संचालक मंडळाने दिलेल्या सहीच्या अधिकारानुसार 25 वर्षे उलटूनही बि.एस.एन.एल. ने भुखंडाचा मावेजा संस्थेस दिला नाही म्हणुन बि.एस.एन.एल. कडे पाठपुरावा करुन बि.एस.एन.एल. चे अधिकारी व संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक घेउन चर्चेअंती सध्या बि.एस.एन.एल. ची ही आर्थिक स्थिती बरोबर नाही म्हणुन मुळ 9 लक्ष 10 हजार पेक्षा जास्त मावेजा देउ शकत नाही म्हणुनआम्ही असमर्थ आहोत असे सांगीतले त्यामुळे दि.04/02/2022 रोजी संस्थापक अध्यक्ष तथा प्रभारी म्हणुन माजी खा. भास्करराव पाटील खतगांवकर व सचिवांनी 17 लक्ष रुपयावर तडजोड करुन ही रक्कम तरी बि.एस.एन.एल. कंपनीने तातडीने संस्थेकडे वर्ग करावी असा करार केला.
त्यामुळे या प्रकरणी कसलाही अपहार, गैरव्यवहार वा भ्रष्टाचाराचा प्रश्नच उद्भवत नाही कारण बि.एस.एन.एल. ही केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील प्रमुख कंपनी आहे आणी या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कुठली रक्कम अनाधिकृत देउ शकतात का..? याचेतरी भान तक्रारकर्त्यांनी ठेवणे आवश्यक होते असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील भिलवंडे यांनी म्हटले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा