स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.२३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, विद्याथी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, शिवराम लुटे, हरीश पाटील, गोविंद हंबर्डे, संभा कांबळे, रामदास खोकले, जगदिश चित्ते, सुधाकर नागरे, कपिल हंबर्डे, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले 


▪️ प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियानामुळे विद्यापीठाच्या विकासाला चालना

-प्रो. टी. ए. कदम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे. त्या अनुषंगाने अनेक विद्यापीठामार्फत वेळोवेळी योग्य असे कार्यक्रम घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा बाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागरूकता करण्यात येत आहे. याबाबतीत स्वतः मा. प्रधानमंत्री महोदय अग्रगण्य अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठाला आर्थिक मदत देऊन विद्यापीठ विकासाला चालना मिळत आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियानाचे समन्वयक प्रो. टी.ए. कदम यांनी व्यक्त केले.

प्रो. कदम दि. २० फेब्रुवारी रोजी विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये आयोजित उच्चस्तर शिक्षा अभियानाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, प्रो डॉ. शैलेश वाढेर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्यप्रणालीद्वारे संपूर्ण देशातील प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियानाचे उद्घाटन केले. अभियानावर मार्गदर्शन करून अभियानाचे महत्त्व पटवून दिले आणि उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या कार्यक्रमास विद्यापीठातील संकुलाचे संचालक, प्राध्यापक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 


------------------------------------------------------------------------------------------------------------------------


प्रति, 


मा. संपादक/ जिल्हा प्रतिनिधी, 


दैनिक/इलेक्ट्रॉनिक मेडिया/सामाजिक संपर्क माध्यम,  


सप्रेम नमस्कार,


मान्यवर/ महोदय, 


उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धीस देऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती. 


आपला विश्वासू, 


जनसंपर्क अधिकारी,


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,


ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड - ४३१ ६०६.




टिप्पण्या