नांदेड /प्रतिनिधी- लोकसभा निवडणुकीचा बिगुल आता कोणत्याही क्षणी वाजू शकतो. मराठवाड्यात भाजपचा जोरदार प्रचार सुरू आहे. आम्हीच विकास केला आहे आणि आमचीच सत्ता येणार त्या दिशेने प्रचार यंत्रणा आणि मोर्चे बांधणी चालू आहे अशी राजकीय परिस्थिती निर्माण होत आहे. या दृष्टीने इतर राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे. यात भाजपाचा एक पाऊल पुढे दिसते. प्रचार यंत्रणासाठी खास मीडिया पर्सन निर्माण केले म्हणावे लागेल. भाजपात लोकसभा निवडणूक लढू इच्छिणारी संख्या तशी वाढत आहे. आ. राम पाटील रातोळीकर, डॉ. संतुकराव हंबर्डे ,डॉ.अजित गोपछडे, डॉ. धनाजीराव देशमुख या इच्छुकांना लोकसभेचे उमेदवारी अपेक्षित आहे असे निष्ठावंत कार्यकर्त्यात बोलले जाते. लोकसभेच्या निवडणुक होण्यापूर्वीच भाजपात उमेदवारी प्राप्त करण्याच्या वादावरून फूट पडण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत. लोकसभेची उमेदवारी अनेक जण मागत आहेत. परंतु इच्छुकांच्या या रांगेत प्रथम क्रमांकाचे नाव आ. राम पाटील रातोळीकर यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे . यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, विधान परिषदेचे आ. राम पाटील रातोळीकर, पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे आदींच्या नावांचा प्रमुख प्रामुख्याने समावेश आहे. इच्छुकांची या यादीत आणखी काही भाजपा महिला आघाडीतील नावे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षश्रेष्ठ त्या- त्या मतदारसंघाच्या आपल्या अभ्यासानुसार खांदे पलट फेरबदल किंवा नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येईल असेही फेरबदल होण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत. अशी माहिती एका वरिष्ठ जबाबदार नेत्याने दिली. नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच पुनश्च एकदा निवडणूक रिंगणात उतरले जाऊ नये याची काळजी विरोधी पक्षातले मोठे नेते घेत असल्याची माहिती आता पुढे येत आहे. खा. प्रताप पाटील चिखलीकर वंचितमुळे निवडून आले. त्या दृष्टीने यावेळेसही वंचित सारखा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर पुन्हा काँग्रेसला पराभूत करण्यासाठी यशस्वी होऊ शकतो असं गृहीत धरल्या जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न केले त्यांनी आपले केंद्रात वजन स्थापन करून रेल्वेच्या समस्या ही सोडविल्या ,बिदर रेल्वे मार्ग मंजूर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हे नाकारता येत नाही. त्यांनी मात्र नागपूर -वर्धा -यवतमाळ -उमरखेड रेल्वे मार्गाकडे कमालीचे दुर्लक्ष आहे हेही नाकारता येत नाही. भाजपाचे जुने निष्ठावंत मोठे पुढारी नाराज आहेत. याचाच फायदा नांदेड येथील काँग्रेसचा मोठा पुढारी येणार हे निश्चितच मानले जात आहे. भाजपचे दोन गट निश्चितपणे निर्माण करण्याची खेळी खेळल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची दुसऱ्यांदा खासदार होण्याची तीव्र इच्छा आहे त्यांनी आपली प्रचार यंत्रणा सुद्धा कामाला लावली आहे. विरोधी पक्षाकडून मात्र मॅनेज होणारा भाजपाचा उमेदवार असला पाहिजे त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न चालू असल्याची गोपनीय माहिती आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा