नांदेडच्या सायन्स कॉलेज येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचे उद्घाटन संपन्न*


 नांदेड प्रतिनिधी सायन्स कॉलेज नांदेड चा राष्ट्रीय सेवा योजना विभागातील आयोजित युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास विशेष वार्षिक शिबिर वडेपुरी ता. लोहा, जिल्हा नांदेड येथील अन्नपूर्णा माता मंदिरच्या परिसरात दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी ठीक 10.30 वाजता संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी शिबिरासाठी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. माधुरी देशपांडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी आणि नां ए सो चे पदाधिकारी मा. डॉ व्यंकटेशजी काब्दे, डॉ सीए प्रवीण पाटील, सौ शामल ताई पत्की, प्रफुल्लजी अग्रवाल व सर्व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात अध्यक्ष व उद्घाटक म्हणून नां ए सो नांदेड चे उपाध्यक्ष मा. डॉ सीए प्रवीणजी पाटील उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. रासेयो चे स्थान माझ्या हृदयात आहे, आणि मी यावर खूप प्रेम करतो, माझे विद्यार्थ्यांशी खूप जवळचे नाते आहे, आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी मी धावून येतो. असे शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून स्वा रा ती म वि नांदेड चे रजिस्ट्रार मा. एस सी ढवळे हे उपस्थित होते. राष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे खूप मोठे कार्य आहे. सायन्स महाविद्यालयाने उत्कृष्ट प्रकारे रासेयो शिबिराचे आयोजन करून मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व विद्यार्थी सहभागी झाले त्यांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांनी शिबिराचे आयोजक म्हणून उत्कृष्ट प्रकारे भूमिका बजावून शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष उपस्थितीमध्ये उपप्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून प्रेरक अशी गोष्ट सांगून शिबिरात उद्बोधन केले.रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ आर ए मुनेश्वर, प्रा अविनाश गाडगे, प्रा श्रीकांत दुलेवाड, विद्यार्थ्यांमध्ये आशुतोष घाटोळे, अभिषेक जाधव, लिंगप्पा साये, ऋषिकेश घाटोळे, अजय राठोड, आनंद नरवाडे, ओमकार चोपडे, जयेश शेट्टी, भुनेश्वर मदनुरे, संदीप पोहरे, दिनेश चव्हाण असे अनेक विद्यार्थी व अन्नपूर्णा मंदिर, वडेपुरी येथील सेवक मां. कपिल बोडके, पांडुरंग तोरणे आणि दिलीप कारेगावकर आचारी गुलाब सिंह यांनी शिबिर आयोजनासाठी विशेष मोलाचे सहकार्य केले. वडेपुरी ग्रामपंचायत येथील सरपंच मा गोपाळ सावळे व त्यांचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि अन्नपूर्णा मंदिर, ट्रस्टच्या अध्यक्ष मा. सुषमा गहेरवार या सर्वांनी शिबिर आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिराचे संयोजन करुन उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना केली. स्वयंसेवक गोविंद कंठाळे यांनी उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन केले. खूप मोठ्या संख्येने शिबिरात शिबिरार्थींची उपस्थिती होती. गीत गायन, संगीत खुर्ची असे वेगवेगळे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करून विद्यार्थ्यांनी शिबिराचा व तेथील परिसराचा आनंद लुटला.


टिप्पण्या