.मुखेड प्रतिनिधी दि. (२५ )
मुखेड तालुक्यातील बहुचर्चित दोन राज्यांच्या संयुक्त विद्येमाणे होऊ घातलेल्या लेंडी धरणाच्या बाबतीत
गेल्या शहाण्णव दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्या हस्ते साखळी उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले आहे. आज शहाण्णव्या दिवशी मुक्रमाबाद प्रकल्पग्रस्तांनी हे उपोषण सोडले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत लेंडी प्रकल्पातील शिल्लक असलेल्या आठ गावातील मुळ कुटूंब व वाढीव कुटूंबाची शासनाने लेंडी प्रकल्पातील मावेजा वाटप करावा आणि लेंडी धरणाच्या पाळूवर असलेली झाडे,झुडपे काढण्यासाठी लेंडी प्रकल्पातील अतंर्गत बोर्ड लावून पाळूवर उटलेली झाडे काढावी अशी संघर्ष समिती व जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी दरम्यान ठरले आहे. शासनाने शेतकऱ्यांना लेखी देऊन पाळूला हात लावावे. जेव्हा धरणाच्या कामाला शासन सुरूवात करेल तेंव्हा शेतकऱ्यांच्या जमिनीला विशेष पॕकेज मंजूर करूनच कामाला सुरुवात करावी अन्यथा धरणाच्या कामाला सुरुवात करू नये आणि २१ वर्षावरील मुला -मुलींना वाढीव कुटूंबात समावेश करावा अशा अनेक महत्त्वाच्या मुद्यावर विषयावर चर्चा केली. जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकऱ्यांना शब्द दिल्याप्रमाणेच शेतकऱ्यांना बैठक घेऊनच धरणाच्या पाळूला हात लावे अशी मागणी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, राजू पाटील, दिनेश आवडके, उपोषण करते संदिप पाटील अतनूरे,किरण पाटील कोठारे, व्यंकटराव खंडागळे, तानाजी आगदे, गौतम भास्करे, दत्ता कोंडामंगले, बळीराम पाटीलसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

addComments
टिप्पणी पोस्ट करा