नांदेड/प्रतिनिधी,दि.- राज्यात संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांचे डॉ. मोहन चव्हाण यांनी आभार मानले आहेत.
डॉ. मोहन चव्हाण हे भाजपच्या तांडा- वस्ती संपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आहेत. बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वंकष उत्थानासाठी आणि विविध विकास योजनांसाठी राज्य शासनाने विशेष योजना राबवावी असे निवेदन डॉ. मोहन चव्हाण यांनी देऊन याविषयी आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या निवेदनाची दखल घेत राज्य शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला.
या योजनेत तांड्यांमध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान 1000 इतकी लोकसंख्या आणि दोन गावातील तीन किलोमीटर अंतर असण्याची अट याद्वारे शिथिल करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून ही समिती बंजारा लमाण तांडा घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्यांना महसुली गाव घोषित करणे, तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करणे या अनुषंगाने कारवाई करेल.
addComments
टिप्पणी पोस्ट करा