कथाकार जया किशोरी यांच्या सत्संग सोहळ्यास जनसागर लोटला. माजी मुख्यमंत्री खा.चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन.
• Global Marathwada
नांदेड/प्रतिनिधी -नांदेडचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील यांनी आयोजित केलेल्या जया किशोरी यांच्या सत्संग सोहळ्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला प्रचंड मोठा जनसागर उसळला होता. सत्संग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी श्रीकृष्ण कथेने प्रारंभ करण्यात आला. आज श्रीराम कथेने सत्संगची सांगता होणार आहे. श्रीकृष्ण कथेला सुरुवात होण्यापूर्वी उपस्थित जिल्ह्यातील सर्व संतमहंतांचे स्वागत चिखलीकर परिवाराच्या वतीने करण्यात आले. प्रारंभी श्रीकृष्णाची आरती खा.चव्हाण,खा.चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आली. खा.चिखलीकर यांच्यावतीने खा.अशोकराव चव्हाण,माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,आ.बालाजी कल्याणकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, मनपा आयुक्त संदीप डोईफोडे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, गुरुद्वारा बोर्डाचे स.ठाणसिंघ महाराज, चैतन्य बापु देशमुख, गंगाधर जोशी, प्रविण साले,दिलीप कंदकुर्ते यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक भाषण कार्यक्रमाचे संयोजक भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील यांनी केले. जया किशोरी यांचा सत्कार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, सौ.प्रतिभा पाटील चिखलीकर,सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केला. खा.चिखलीकर यांनी आपल्याला अध्यक्षीय भाषणात म्हणाले, अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात प्रभू रामलल्ला मुर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आल्याने संपूर्ण देशात राम लहर आली आहे. मनोगताला सुरुवात करताच खा.चिखलीकरांनी दिलेल्या हारहर मोदी,घर घर मोदींच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे कणखर नेतृत्व देशाला मिळाल्याने बलवान भारताची निर्मिती झाली. कॉग्रेसमधून भाजपात दाखल झालेले अशोकराव चव्हाण यांच्यासह डॉ.अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन नांदेड जिल्हाला दोन खासदार मिळाल्यामुळे आता जिल्ह्याला पाच खासदारांचे नेतृत्व लाभले आहे. खा.चव्हाण यांच्या भाजपा आगमनामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होणार आहे. खा.अशोकराव चव्हाण व माझ्यात जो काही राजकीय संघर्ष होता तो आता संपला आहे. यापुढे आम्ही दोघेही खांद्याला खांदा लावून जिल्ह्याच्या विकासासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. . यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना,खा.अशोकराव चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आपला खासदार या नात्याने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी खा.चिखलीकरसह आम्ही सर्व खासदारांनी दिल्ली दरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन जिल्ह्याचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी राजेश देशमुख कुंटूरकर, बालाजी बच्चेवार,श्रावण पाटील, चैतन्य देशमुख, डॉ. सचिन पाटील उमरेकर, प्रविण साले, भाजपा प्रवक्ता प्रल्हाद उमाटे, बाबुराव पुजरवाड, सुरेश राठोड, सचिन पाटील चिखलीकर, संदीप पाटील चिखलीकर,दिलीप सोनटक्के, सुहास पाटील, गणेश पाटील सावळे, सुरेश लोक आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन दिलीप सिंह ठाकुर व विक्रम कदम यांनी केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा