हिमायतनगर .तालुक्यातील ,मौजे घारापुर येथील शेतकरी प्रगतशील शेतकरी सदानंद ढगे यांची सह्याद्री दुरदर्शन वाहीणीवर मुलाखत

 

हिमायतनगर/ प्रतिनिधी अनिल नाईक/ तालुक्यातील मौजे घारापुर येथील प्रगतिशील शेतकरी सदानंद ढगे सर यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायात उतुंग भरारी घेत महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने चिकन सेंटर, फळभाग लागवड, यांत्रिकीकरण आपल्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी स्वतः भेट दिली ढगे यांनी शेतकरी बचत गट स्थापन करुन कंपनी स्थापन करुन “पिकेल ते विकेल योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या शेतीसाठी पिकविलेला माल स्वतः विकत तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याच बाबीची दखल घेऊन त्यांना विविध महाराष्ट्र शासन कृषि विभागा आणि पशुपालन दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने पुरस्कार मिळाले आहेत

याच बाबीची दखल घेत दिनांक दुरदर्शन सह्याद्री वाहीणीवर ” आमची माती आमची माणसं” या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखत झाली. त्या मुलाखतीचे प्रसारण आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 मिनिटांनी सह्याद्री दुरदर्शन वाहीणीवर प्रसारित होत आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या मुलाखतीचा लाभ घ्यावा. असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले आहे


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज