Kinwat
येथील तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांची आठवडाभरापूर्वी धाराशिव येथे बदली झाली.यानिमित्त स्थानिक महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी ,तलाठी,पालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने डॉ. जाधव यांना शनिवारी दि.२४ समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार विकास राठोड होते.याप्रसंगी डॉ.जाधव यांचे पती डॉ.संकेत आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सर्व कर्मचारी संघटनांच्यावतीने तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित अधिकारी,कर्मचाऱ्यांची समयोचित भाषणे झाली.किनवटसारख्या दुर्गम भागात तहसीलदारांसह इतरही अतिरिक्त पदभार होता.येथील जनता,लोकप्रतिनिधी,अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच अडीच वर्षाचा कार्यकाळ यशस्वी करता आला.इथल्या अनुभवाची शिदोरी निश्चितच भावी कार्यकाळात उपयुक्त ठरेल,असे सांगताना डॉ.जाधव ह्या भावूक झाल्या.अध्यक्षीय समारोपात नायब तहसीलदार विकास राठोड यांनी तहसीलदार डॉ. जाधव यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.याप्रसंगी आमदार भीमराव केराम,माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, साजीद खान,अनिल तिरमनवार,संदीप केंद्रे, आत्माराम मुंडे यांनीही डॉ.मृणाल जाधव यांचा सत्कार केला.

addComments
टिप्पणी पोस्ट करा