कौशल्याधिष्ठित शिक्षण काळाची गरज - प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे

नांदेड : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांनी कीर्तन व नाटकाचे आयोजन करून अंगीक कौशल्य मराठी भाषेतून कशी वृद्धिंगत होतात याचा वस्तुपाठ सादर केला .

         यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ. संजय जगताप, डॉ .विश्वाधार देशमुख, डॉ. विजय भोसले, डॉ.साईनाथ साहू, प्रबंधक संदीप पाटील, डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मराठी भाषा विविध कलाविष्कारातून समजावी या प्रयोजनातून महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी गजानन शिंदे मरळककर याने उत्तम असे कीर्तन सादर केले तर कृष्णा वाघमारे या विद्यार्थ्याने वऱ्हाड निघाले लंडनला या एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे म्हणाले की मराठी विभागाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विद्यार्थी हेच खरे माध्यम आहे, असे म्हणत असतानाच महाविद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी कीर्तन करीत आहे तसेच नाटकाचे सादरीकरण करीत आहे हे पाहून अत्यंत आनंद झाल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आजच्या काळामध्ये कौशल्याधिष्ठीत शिक्षणाची किती आवश्यकता आहे, या शिक्षणातूनच रोजगार निर्मिती होऊन विद्यार्थी घडू शकतात हे आज गजानन शिंदे या विद्यार्थ्यांने दाखवून दिले असे गौरव उद्गार याप्रसंगी त्यांनी काढले. प्रास्ताविकामध्ये डॉ. विश्वाधार देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी कौशल्याला प्राधान्य देऊन विविध क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मनोगत प्रसंगी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक सुप्त गुण असतात. मराठी भाषेमुळे त्या सुप्त गुणांना विविध प्रकारची व्यासपीठे मिळतात. त्यामुळे मराठी भाषा ही अतिशय महत्त्वाची भाषा असल्याचे विधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश विनकरे या विद्यार्थ्यांनी मानले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज