नांदेड/ दिनांक,-
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तांडा- वस्ती संपर्क अभियानाची कार्यकारणी जाहीर केली आहे.तांडा- वस्ती संपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक डॉ. मोहन चव्हाण यांनी या समितीतील नावांची शिफारस केली होती.राज्य पातळी आणि जिल्हास्तरीय कार्यकारणीचा यात समावेश आहे.यात महाराष्ट्रातील बंजारा बहुल ते अगदी लहान तांड्यांवरच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार जिल्हा पातळी ते राज्य पातळीपर्यंत काम करण्याची संधी देण्यात आली आहे. येत्या पंधरा तारखेला श्री संत सेवालाल महाराज जयंती आहे.त्या दिवसापासून पुढे एक पंधरवडाभर "तांडा चलो" अभियान राबवण्यात येणार आहे. यात प्रत्येक तांड्यावर दहा जणांची समिती नेमली जाईल. त्याद्वारे केंन्द्र सरकारकाच्या विविध लोकोपयोगी योजना, उपक्रमांची माहिती देऊन,त्यांचा फायदा कसा घेता येईल हे सांगितले जाणार आहे. त्यानंतर तांडा बांधवांच्या सूचनेनुसार विकासात्मक कार्याची शिफारस केली जाणार आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष जनजागृतीसाठी अगदी ग्रामीण भाग तसेच दूरपर्यंत असलेल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा