नवी मुंबई सानपाडा येथील समाजसेवक व हिंदू धर्मरक्षक संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब (विठ्ठल) बजाभाऊ महाले यांचे २६ जानेवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे वय जाण्याचे नव्हते, त्यामुळे कुटुंबाला निश्चितच धक्का बसला आहे. सर्वांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करणारे बाळासाहेब महाले यांची कायम स्वरुपी आठवण रहावी म्हणून सानपाडा येथील गार्डनला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी सानपाडा येथील रहिवाशांनी केली आहे.
कै. बाळासाहेब महाले यांची शोकसभा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी केमिस्ट भवन येथे संपन्न झाली. या शोकसभेत नवी मुंबईचे निर्माते व लोकनेते मा. श्री. गणेश नाईक यांनी श्रद्धांजलीपर भाषण करताना सांगितले की, बाळासाहेब महाले यांचा स्वभाव व वागणं सर्वसमावेशक होतं. कामे कशी करून घ्यावी, याचे आदर्श उदाहरण म्हणजे बाळासाहेब महाले आहेत. अनेकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. सर्वांच्या सुख दुःखाला धावून गेले. अनेकांना संकट प्रसंगी मदत केली. हिंदू धर्म रक्षण करण्याचे ते एक महान कार्य करीत होते. सानपाडा रहिवाशांचा मागणीचा निश्चितच विचार करून येथील गार्डनला किंवा योग्य ठिकाणी बाळासाहेब महाले यांचे नाव देण्यासाठी आपण प्रयत्न करू. याप्रसंगी माजी खासदार व नवी मुंबईचे माजी महापौर श्री. संजीव नाईक, भाजप आयटीसेलचे सतीश निकम, समाजसेवक भाऊ भापकर, विसाजी लोके, अजित सावंत, सुनील कुरकुटे , अनिल कुरकुटे, बाबाजी इंदोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, शिवसेनेचे अजय पवार, श्रीकांत चव्हाण , सुनील नाईक आदी मान्यवरांनी बाळासाहेब महाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शोकसभेस जालिंदर भोर, ज्ञानेश्वर जाधव , विष्णुदास मुखेकर, शिवाजी पाटणे, निवृत्ती ढोबळे, बलजीत सिंग अरोरा, श्यामराव मोरे, गणेश कमळे, आदी मान्यवर उपस्थित होते. शोकसभेला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव


addComments
टिप्पणी पोस्ट करा