किनवट : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीने किनवट - माहूर विधानसभेच्या निरीक्षकपदी गिरीष यादवराव नेम्मानिवार यांची निवड केली. एका तरूण कार्यकत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हातात कमळ घेतले. त्यामुळे काँग्रेसला उतरती कळा लागेल अशी चर्चा सुरू होती. काँग्रेसला पुनश्च उभारणी देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व विधानसभेच्या निरीक्षकांची तत्काळ नेमणूक केली. काँग्रेस पक्षात अनेक वर्ष काम केल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेत असतात. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माझी निवड केली असावी. त्यांनी दाखवलेल्या जबाबदारीतून पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे, असा विश्वास नेम्मानिवार यांनी व्यक्त केला.

addComments
टिप्पणी पोस्ट करा