पुणे दि.११ :खेड्यातील शाळेमधील विद्यार्थ्यांची गळती थांबवायची असेल तर आता शिक्षकांना शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून आपले कसब सिध्द करावे लागतील,असे आवाहन नसरापूर श्री शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आणि विद्यमान संस्थासचिव एल.एम.पवार यांनी येथे शिक्षकांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना केले आहे.
शिक्षणाचे माहेरघर ठरलेल्या,पुणे जिल्ह्या शिक्षण मंडळाची पहिली शाळा म्हणून ओळख असलेल्या नसरापूर येथील श्री.शिवाजी विद्याल यात नुकताच,१९९६च्या बॅचचे विद्यार्थी आणि शिक्षकांचा'स्नेहमेळावा" पार पडला. त्यावेळी एल.एम. पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री.शिवाजी विद्यालयात नसरापूरसह पंचक्रोशीतील विद्यार्थी एकत्र येत असत,त्यावेळी प्रत्येक वर्ग विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेला असे, या भूतकाळातील आठवणींना आपल्या भाषणात एल.एम पवार यांनी उजाळा दिला.परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही,या बाबत खंत व्यक्त करन श्री पवार म्हणाले, गुरू शिक्षकांची परंपरा या आशा गावांम धील असंख्य शाळांपासून सुरू झाली आहे.शिक्षक वर्गाने पूर्वीपासूनच 'शिक्षक' ही नोकरी नसुन 'शैक्षणिक सेवा धर्म' मानला आहे.आजही ही परंपरा जोपासली जाते आहे.पण शहराकडील शिक्षणाकडे पालकांचा ओढा वाढला आणि येथील शाळांची पटसंख्या रोडावली.पण एक दिवस असा उजाडेल की,खेड्या-पाड्यातील शाळांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांची रीघ लागेल आणि येथील पूर्ववैभव प्राप्त करण्यास शिक्षक नक्कीच यशस्वी ठरतील,असा विश्वासही शिक्षण तज्ज्ञ एल.एम. पवार यांनी शेवटी आपल्या भाषणात व्यक्त केला.
स्नेहमेळाव्याला तत्कालीन शिक्षक एस.यादव,पी.एन.खुटवड,व्ही.
बी.शेवाळे,पी.बी.भोर,एस.एस.गायकवाड,एल.एच.शिंदे,आर.जी.पोळउपस्थित होते.तर तत्कालीन विद्यार्थी खडकी गावचे सरपंच सचिन रांजणे, उबाठा शिवसेनेच्या शाखाप्रमुख उज्वला निकम, विजय थिटे,नाना शिळीमकर, योगेश बागमार, रविंद्र शेडगे, गणेश गोळे, रविंद्र मांढरे उपस्थित होते.कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट नियोजन लाभले.शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव शिंदे,पर्यवेक्षक अंकूश खोपडे यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रोजेक्टर भेट देण्यात येवून,शाळेविषयी स्नेहभाव जतन केला.****

addComments
टिप्पणी पोस्ट करा