नांदेडच्या शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविणारे भारतीय जनता पक्षाचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव लोकाभिमुख नेतृत्व डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा आज वाढदिवस.त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा शब्दप्रपंच...उच्चविद्याविभूषित, शांत-संयमी सुस्वभाव,निःस्वार्थ आणि राजकीय , सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून भारतीय जनता पक्षाचे नांदेड दक्षिणचे जिल्हाथ्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे सर्वदूर परिचित आहेत. सहयोग या नामांकीत शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण करण्यात डॉ.संतुकराव हंबर्डे यशस्वी ठरले असून पक्षसंघटन कौशल्य,दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची प्रचंड फळी आणि जिल्ह्यातील राजकारणावर असलेली त्यांची दमदार पकड या डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या जमेच्या बाजु आहेत. 2014 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून उपकुलसचिव पदाचा राजीनामा देऊन भाजपात दाखल होताच त्यांनी संघटनात्मक चळवळ मजबूत करण्यावर भर दिला. पक्षसंघटनेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर नांदेड महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. ही जबाबदारी सांभळताना जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची यशस्वी सांगड घालत त्यांनी महानगरात पक्षाची कमान उंचावली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ते उमेदवारीसाठी इच्छूक होते. परंतु पक्षश्रेष्ठींनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी बहाल केली. पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानत त्यांनी उमेदवार चिखलीकर यांच्या विज्यासाठी जीवाचे रान केले.
सध्या पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)ची जबाबदारी सोपविली असून त्यांचे जिल्हाभरात झंझावती दौरे सुरु आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन त्यांनी संघटन मजबुतीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. महानगराध्यक्ष ते ग्रामीण जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास असल्याने शहरासोबत ग्रामीण जनतेशीही त्यांची नाळ जोडली गेली आहे.
एक संहिष्णु व विनयशील व्यक्तिमत्व म्हणून डॉ.संतुकराव हंबर्डे सर्वाांनाच परिचित आहेत.राजकीय क्षेत्रातही तेवढ्याच दूर्दम्य आत्मविश्वासाने पक्षाची धूरा सांभाळून वेगवेगळ्या विचारांच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या वैचारिक छत्रछायेखाली एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याची हातोटी डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्याकडे आहे.
पक्षासाठी वाट्टेल ते म्हणणार्यांपैकी ते एक आहेत. एकीकडे शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अमाप आणि अफाट संपत्ती गोळा करण्याच्या स्पर्धेतील भयावह चित्र पहावयास मिळते आहे, तर दुसरीकडे मात्र याच क्षेत्रातील उच्चविद्याविभूषित आणि शैक्षणिक क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेले डॉ. संतुकराव हंबर्डे यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे. एकेकाळी नांदेड महानगरात भाजपा असून नसल्यागत अवस्थेत असताना डॉ. हंबर्डे यांनी सुत्रे स्वीकारताच पक्षाला नवी उभारी देण्याचे काम केले. जिल्हा परिषद, पंचायत समित्यासह नांदेड महानगर पालिका निवडणुकीत पक्षाला दुसर्या क्रमांकाची मते मिळवून देण्यात डॉ. हंबर्डे यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. हंबर्डे यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. कार्यकर्त्यांची फळीही तेवढीच व्यापक आहे.पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नाही. कार्यकर्त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या ‘सहयोग’ची दारे नेहमीच खुली असतात. कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्याभोवती नेहमीच पहायला मिळतो.
एकीकडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्षाच्या वाटचालीविषयी चर्चा, आढावा आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचाही ध्यास अशी दुहेरी भूमिका पार पाडणे म्हणजे एक मोठी कसरतच. परंतु कोणतीही अडचण सहजरित्या दूर करण्याची धमक डॉ. हंबर्डे यांच्याकडे असल्यामुळे कोणत्याही आघाडीवर ते यशस्वी होतात. महानगराध्यक्षपदी त्यांची अविरोध झालेली निवड हाही त्याचाच एक भाग आहे. पक्षात गटबाजी असली तरी त्यात संतुलन ठेवण्याची मुत्सद्देगिरी, कसब त्यांना अवगत असल्याने राजकीय प्रवाहात कितीही संकटे आली तरी त्यावर चुटकीसरशी मात करण्याची धमकही ते बाळगून आहेत. काम करीत रहावे, ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते. त्याचा गवगवा, प्रसिद्धी करणे त्यांना अजिबात पटत नाही. गोरगरीब रुग्णांसाठी मोफत औषधोपचार शिबीर, रक्तदान शिबीर, शिवाय इतर सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची रेलचेल त्यांच्या सहयोग संस्थेमार्फत सुरुच असते. समाजाचे आपण काही देणे आहोत, ही त्यांची भावना असते.सहयोगाच्या माध्यमातून त्यांनी सुरु केलेला शैक्षणिक व राजकीय प्रवास आता राजयोगाच्या वळणावरून सुरु आहे. त्यांनी सुरु केलेले सामाजिक, शैक्षणक कार्य असेच अखंडित सुरु राहण्यासाठी लोकाभिमुख नेतृत्व : डॉ. संतुकराव हंबर्डे साहेब यांना दीर्घायुरोग्य मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन.
डॉ. बालाजी गणपतराव गिरगावकर प्राचार्य,एस.एस.एस.कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी,नांदेड 9503849648
addComments
टिप्पणी पोस्ट करा