परभणी (. ) टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व पंजाब टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने २५ वी राष्ट्रीय वरिष्ठ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अंतनपुर (पंजाब) या ठिकाणी संपन्न झाली . या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक तर पुरुष गटात कांस्यपदक पटकावले.
मिश्र दुहेरी गटात प्राची कडणे (सांगली) निलेश माळवे (परभणी)या जोडीने
महाराष्ट्र विरुद्ध पंजाब दरम्यान उपांत्य फेरीत सामन्यामध्ये महाराष्ट्र ( २-० )सेटने विजयी प्राप्त केला अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध केरळ या सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या मिश्र दुहेरीत ( २-० )सेटनी विजयी प्राप्त करून सुवर्ण पदक प्राप्त केले.
पुरुष गटात गुजरात वि. महाराष्ट्र दरम्यान उपांत्य फेरीत
सामन्यात गुजरात संघ (२-१) सेट मध्ये विजयी झाला. कास्यपदक लढतीत महाराष्ट्र विरुद्ध पांडेचेरी सामना झाला त्यामध्ये महाराष्ट्र ( २-० ) सेट ने विजयी झाला.
अशा प्रकारे महाराष्ट्र वरिष्ठ पुरुष गटाने कांस्यपदक पटकावला.
वरिष्ठ पुरुष संघ :-प्रफुल कुमार बनसोड, (कर्णधार)सिद्धांत लिपणे, (परभणी )राहुल पेटकर (लातूर)हेमंत पाटील, प्रवीण किंगरे,(नाशिक)निनाद रहाटे (उपनगर) प्रशिक्षक: आशिष ओबेरॉय (नवी मुंबई) संघ व्यवस्थापक: मंदार कोष्टे (पुणे)
यशस्वी कामगिरी बदल डॉ.व्यंकटेश वांगवाड, आनंद खरे, डॉ.रितेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, डॉ. दिनेश शिगारम, आदी ने अभिनंदन केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा