*गोदी कामगार चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मारुती विश्वासराव यांचा नवी मुंबईत सत्कार*


नवी मुंबई वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ३१ जानेवारी २०२४ रोजी विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य मारुती विश्वासराव यांना पत्रकारिता, कामगार चळवळ, सामाजिक व शैक्षणिक, साहित्य अशा विविध क्षेत्रांत अविरतपणे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार मिळाला म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त, शिवसेनेचे उपनेते, महाराष्ट्र पर्यावरण प्राधिकरणाचे अध्यक्ष व म्हाडाचे राज्यमंत्री आणि लोकनेते मा. श्री. विजय नाहटा, प्रसिद्ध उद्योगपती सुरेश हावरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रवाशी बॅग देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक सर्वश्री. किशोर पाटकर, वैभव गायकवाड, राजू शिंदे, मम्मी चौगुले, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, नवी मुंबई शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने व इतर मान्यवर उपस्थितीत होते . याप्रसंगी लोकनेते मा. श्री. विजय नाहटा यांचा अनेक सामाजिक संस्था आणि मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. करमणूक म्हणून मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम होता.

टिप्पण्या