तरोडा सांगवी अंतर्गत नाव परिवर्तनाच्या एकूण प्रलंबित संचिका 541 पैकी 387 संचिका निकाली

 

कर उपायुक्त पंजा्बराव खानसोळे यांच्या लोकाभिमुख उपक्रमाची सर्व स्तरातुन कौतुक  

नांदेड प्रतिनीधी 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड क्षेत्रीय कार्यालय क्र-9 तरोडा सांगवी क्षेत्रिय कार्यालय क्रमांक १ तरोडा/सांगवी अंतर्गत सर्व मालमत्ता धारकांना जाहीर आवाहन करण्यात  आले होते त्यानुसार , ज्या मालमत्ता धारकांनी क्षेत्रिय कार्यालय क्रमांक 9 तरोडा | सांगवी अंतर्गत नांव परिवर्तन/कर आकारणी/नविन घर नंबर/विभाजन इत्यादींसाठी प्रस्ताव सादर केले होते . परंतु ते अद्यापही प्रलंबित आहेत. अशा मालमत्ता धारकांसाठी दि.०५.०२.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शिबीर आयोजित करन्यात आले होते यावैळी  कर उपायुक्त पंजाबराव खानसोळे  साहेब यांच्या नेत्रत्वात      सदरील शिवीराला नागरीकांचा चांगला प्रतीसाद मिळाला असुन स्वता कर उपायुक्त पंजाबराव खानसोळे   यानी लक्ष घातल्याने आनेक प्रस्ताव तात्काळ निकाली लागले आहेत क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 01 तरोडा सांगवी अंतर्गत नाव परिवर्तनाच्या एकूण प्रलंबित संचिका 541 असून त्यापैकी आज रोजी 387 संचिका निकाली काढण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 154 संचिका निघाली काढण्यास प्रस्तावित आहेत. त्या उद्यापर्यंत निकाली काढण्यात येतील.आज शिबिरामध्ये नागरिकांना एकूण 56 नाव परिवर्तन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच आज रोजी नागरिकांनी शिबिरामध्ये सहभाग घेऊन  मालमत्ता कर रुपये 104630/- चा भरणा केलेला आहे.शिबीरास आवश्यक त्या कागदपत्रासह मालमत्ता धारकांनी उपस्थित राहून प्रशासनासमोर आपल्या व्यथा मांडल्या व व्या निकाली देखील काढन्यात आल्या यावेळी कर उपायुक्त पंजाबराव खानसोळे साहेब क्ष्रेत्रिय अधीकारी  नीलावती डावरे   कार्यालयीन अधिक्षक संतोष  जिंतुरकर ,सुरेखा टाकळीकर ,बालाजी सोळंके ,श्रीकांत जाेशी ,सुमित बुक्तरे ,रमेश डोले आदि कर्मचारी उपस्थित होते 


टिप्पण्या