मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत.
सेलू: (. )क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने दि. २१ जानेवारी रोजी जिल्हा शालेय टेनिसव्हॉलीबॉल, रस्सीखेच, फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा " मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत भारतीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्र. मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी पाटील म्हणाले की या क्रीडा स्पर्धेतून भारतीय क्रीडा स्पर्धा ची ओळख होते. आज विद्यार्थी ऑनलाईन खेळावर जास्तीचा भर दिसुन येतो. विद्यार्थी निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे मैदानावर खेळावे असे आवाहन केले.
याप्रसंगी प्रा.नागेश कान्हेकर, निवृत्त क्रीडा शिक्षक सतीश नावाडे, जि.प.के.प्रा.शा. रवळगाव शालेय समितीचे अध्यक्ष नितीन रोडगे, शेख मजिद, अशोक वडजे, गौतम साळवे आदी उपस्थित होते.
सदरील क्रीडा स्पर्धा १४/१७/१९ वर्षे आतील गटात जिल्ह्यातील विविध प्रशालेचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, सूत्रसंचालन सतिश नावाडे, तर आभारप्रदर्शन संजय भुमकर यांनी मानले.
स्पर्धेतस पंच म्हणून संजय भुमकर, संतोष शिंदे,स्वप्निल चव्हाण, सिध्दांत लिपने, सगीर फारुखी, आदी काम पाहिले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा