मुंबई पोर्ट प्राधिकरणाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गोदी कामगारांना भेटवस्तू द्यावी. अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी पोर्ट प्रशासनाकडे केली.
मुंबई पोर्ट प्राधिकरणामधील गोदी विभागाच्या आउटडोअर डॉक स्टाफ पूजा समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी श्री शिवाजी मंदिर दादर येथे गोदी कामगारांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीताने झाली.
ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस.के. शेट्ये यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वप्रथम अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पोर्ट ट्रस्टच्या जागेवर झोपडपट्टी धारकांना जर घरे मिळत असतील तर, गोदी कामगारांनाही घरे मिळाली पाहिजेत. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवानिवृत्त कामगारांना त्यांच्या पेन्शन बुकवर ताबडतोब गोदी परवाना मिळाला पाहिजे. मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना सांगितले की, पेन्शन फंड अपूर्ण आहे त्यामध्ये भरणा केला जात आहे. गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासुन लागू होणारा वेतन करार लवकर होण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. कमी कामगारांमध्ये मुंबई पोर्टने उच्चांकी उत्पादकता गाठली आहे,त्याबद्दल कामगारांचे अभिनंदन. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अनेक वर्ष आऊट डोअर डॉक स्टाफ पूजा समितीच्या वतीने हे कौटुंबिक स्नेहसंमेलन साजरे केले जाते. शिवडी न्हावा शेवा ब्रिज हा मुंबई पोर्टच्या हद्दीतून गेला आहे. त्यामुळे मुंबई पोर्ट कामगारांना टोल फीमध्ये सवलत मिळावी. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख आणि पूजा समितीचे सल्लागार मारुती विश्वासराव यांना सामाजिक, कामगार व पत्रकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व पूजा समितीचे अध्यक्ष दत्ता खेसे व पूजा समितीचे कार्याध्यक्ष अनंत कडवेकर हे सेवानिवृत्त होणार असल्याबद्दल मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन राजीव जलोटा यांच्या हस्ते शाल व बांबू प्लांट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पूजा समितीचे सल्लागार,कलाकार आणि लोकप्रिय निवेदक विजय सोमा सावंत यांनी केले. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून" संज्या छाया " हे नाटक दाखविण्यात आले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा