सानपाडा येथे सुयोग समूह संस्थेतर्फे सायबर क्राईम जनजागृती*


नवी मुंबई सानपाडा येथील सुयोग समूह संस्थेतर्फे " सायबर क्राईम जनजागृती " या विषयावर आयोजित कार्यक्रमात व्याख्याते डॉ. विशाल माने सहा. पोलीस निरीक्षक विशेष शाखा नवी मुंबई यांनी मार्गदर्शन केले. 

व्याख्यानामधील महत्वाचे मुद्दे खोटी प्रोफाइल तयार करून अनेकांना अश्लील संदेश, चित्रे पाठवणे, अकाउंट हॅक करणे, चॅटिंग करताना फसवणे, व्यक्तीला लग्नाच्या जाळ्यात अडकवणे, लैंगिक चाळे करणे, भेटायला बोलावून फसवणूक करणे यासारख्या गंभीर प्रकारांचा सायबर गुन्ह्यांमध्ये समावेश होतो. संगणकाचा उपयोग हा दुधारी शस्त्राप्रमाणे केला जातो. 

वरील सर्व विषयांवर सखोल माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. तसेच डॉ माने यांनी नागरिकांच्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे दिली.

याप्रसंगी सानपाडा नगरीतील बहुसंख्य नागरिक महिला आणि युवा पिढी, बँकेचे कर्मचारी, ०७.५० गार्डन ग्रुपचे सर्व सदस्य, ज्येष्ठ विरंगुळा केंद्र सानपाडा सर्व सदस्य, सोमनाथ वासकर,भाऊ भापकर आणि सुयोग समूह संस्थेचे सदस्य, महिला सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन अजय पवार यांनी केले.

असे मारुती विश्वासराव कळवित आहेत.

टिप्पण्या