राज्य वरीष्ठ टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत परभणी, मुंबई उपनगर विजयी मुख्यमंत्री "माझी शाळा सुंदर शाळा" अभियान अंतर्गत

 


पाटणबोरी ( ) टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन च्या मान्यतेने यवतमाळ जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन व रेड्डीज कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूल पाटणबोरी यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत भारतीय खेळ क्रीडा प्रकारात टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा . 25 वी राज्यस्तरीय सिनियर गटात (मुले/मुली)व वयस्कर टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पाटणबोरी येथे दि. 27 ते 28 जानेवारी 2024, रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेतून पुरुष गटात परभणी, नाशिक, लातूर, अनुक्रमे विजयी ठरले तर महिला गटात मुंबई शहर, यवतमाळ विजयी ठरले. 


अंतिम सामन्यात नाशिक वि.परभणी दरम्यान 2-0 सेट मध्ये परभणी विजयी, नाशिक उपविजेता, लातूर: तृतीय तर महिला गटात मुंबई उपनगर वि. यवतमाळ दरम्यान 2-0 सेट मध्ये मुंबई उपनगर विजयी तर यवतमाळ उपविजयी ठरले.

मिश्र दुहेरीत प्रथम: मुंबई शहर, व्दितीय: यवतमाळ ,तृतीय: लातूर 

वयस्कर गटात: गणेश माळवे: (प्रथम) संजय ठाकरे: (व्दितीय) सतिश नावाडे (तृतीय)

बक्षीस वितरण समारंभा साठी अध्यक्ष स्थानी सुरेश रेड्डी क्यातमवार, प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश वांगवाड, राज्य सचिव गणेश माळवे, राज्य कोषाध्यक्ष डॉ. दिनेश शिगारम, विभागीय सचिव रामेश्वर कोरडे, राज्य सदस्य संजय ठाकरे, सतीश नावाडे, के.जे.शेख, प्राचार्या सौ. सविता रेड्डी , प्रफुल्ल बनसोड,उपस्थित होते. 

याप्रसंगी डॉ. वांगवाड म्हणाले भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळाबद्दल माहिती दिली. टेनिस व्हॉलीबॉल खेळ आरोग्यदायी खेळ असून हदय क्षमता वाढवणारा खेळ आहे. आज बालक ते वयस्कर हा खेळ खेळाडू खेळतात. हा खेळ सर्व शालेय व आदिवासी शाळेत विद्यार्थ्यांनी खेळावा असे आवाहन केले. 

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

पंच म्हणून: संतोष शिंदे, प्रजंल पिपळकर, 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यवतमाळ जिल्हा सचिव अभय धोबे, आशिष ओबेरॉय, तेजस पाटील, नितीन खाटे, अनिता धिकार.

 महाराष्ट्र राज्य संघ 25 वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा. अंनतापुर (पंजाब) येथे दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान सहभागी होणार आहे. या करीता राज्य संघाची निवड करण्यात आली.

टिप्पण्या