सानपाडा येथील मराठा देशस्थ भवन बनतय डोकेदुखी*

नवी मुंबई सानपाडा येथील सेक्टर ०८ मध्ये मुंबई ज्ञाती देशस्थ मराठा भवन इमारत ही चारही बाजूंनी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी व्यापलेली आहे. याठिकाणी नेहमीच लग्न समारंभ होत असतात. त्यामुळे पार्किंग व्यवस्था नाही, वाद्य वाजवण्यासाठी आणि फटाके फोडण्यासाठी मुंबई आयुक्तालयाने बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवताना दिसत आहे. या ठिकाणी २८ जानेवारी २०२४ रोजी लग्न झाल्यानंतर निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले तसेच वाद्य देखील वाजवली गेली. त्यामुळे एक १०/१५ वर्षे जुने सुभाबळीचे झाडाला २० फूट उंचीवर आग लागली. ही बातमी कळताच शिवसेना शहर प्रमुख सुनिल गव्हाणे आणि शिवसेना विभाग प्रमुख अजय पवार यांनी तात्काळ अग्निशामक दलाला संपर्क केला आणि आग आटोक्यात आणली. फटाक्या मुळे आग लागली असल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी विकास मोरे यांनी सांगितले. अग्निशामक दलाने तत्परतेने कारवाई केली. त्याबद्दल उपस्थित राजबा गावकर, रणवीर पाटील, मारुती विश्वासराव, विजय देवाडीगा, आप्पा देशमुख आणि सर्व सुयोग समूह रहिवाश्यांनी आभार मानले. *मराठा देशस्थ भवन येथे फटाके आणि वाद्य वाजवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी नागरिकांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे.*

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या