*बंधुत्व फाऊंडेशन तर्फे कारसेवक जोशी व मोरे यांचा सन्मान*

 




६ डिसेंबर १९९२ रोजी आयोध्यामधील बाबरी मशीद पाडण्यात कारसेवकांचे मोलाचे योगदान होते. त्यामध्ये डोंबिवली येथील कारसेवक चंद्रकांत जोशी व भांडुप येथील कारसेवक गोपीनाथ मोरे यांचा समावेश होता. अयोध्यमधील श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आली. या सोहळ्याचे औचित्य साधून २२ जानेवारी रोजी बंधुत्व फाऊंडेशन तर्फे बाबरी मशीदचा ढाचा पाडण्यात योगदान देणाऱ्या चंद्रकांत जोशी व गोपीनाथ मोरे यांचा बंधुत्व फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष समीर राणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डाॅक्स ॲन्ड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, मुंबई पोर्ट प्राधिकरणचे सेवानिवृत्त असिस्टंट मॅनेजर प्रकाश दाते व गुणवंत कामगार संजय तावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,फेटा देऊन सन्मान करण्यात आला . यप्रसंगी फाऊंडेशनचे विभाग प्रमुख सुहास महाजन व भरत खेर, अरविंद महापदी, वसंत जोशी, सुरेश मुरुडकर, विजय घाडी,हरिश्चंद्र सावंत,हेमंत हाटले, मिलिंद गुरव,विवेक पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या