मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने २७ जानेवारी रोजी सगेसोयरे अधिसूचना काढल्या नंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये या अधिसूचने विरोधात प्रचंड विरोध होत आहे. या अधिसूचनेचा विरोध करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन १ लाख असे १६ तालुक्यातुन जिल्हाभरातुन १६ लाख हरकती पत्र राज्य सरकारला पाठवून या अधिसूचनेचा विरोध करण्यात येणार आहे. सरकारने सगेसोयरे ही अधिसूचना तत्काळ रद्द करावी अन्यथा ओबीसी समाज येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारला सत्तेतुन खाली खेचल्या शिवाय शांत बसणार नाही. ओबीसी जनमोर्चा वतीने २ फेब्रुरवारी पासून जिल्ह्यातील प्रत्येक जि प सर्कला बैठका घेऊन ओबीसी समाजा मध्ये जनजागृती करणार आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अहवान अॅड अविनाश भोसीकर, ओबीसी जनमोर्चा चे जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे, बालाजी खरडे, सचिन पेटकर, धिरज हाके, गजानन सरोदे, कैलास पांचाळ, विठ्ठल बेळगे, सुभाष चुटेवाड, साईनाथ कांबळे, भास्कर तळणे, रत्नाकर कुऱ्हाडे आदीनी केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा