अशिक्षित आई-वडिलांने घडविले मुलाला मुलगा झाला तलाटी

 


बिलोली/प्रतिनिण


बिलोली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील अशिक्षित आई-वडिलांनी शेतामध्ये कष्ट करित,अहोराञ मेहनत करुन आपल्या मुलास नागेश तोंदरोड यास उच्चशिक्षण देऊन त्यास तलाटी बनविले आहे.विशेष म्हणजे यापुर्वी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून मुलगी भाग्यश्री हि तलाटी म्हणून नोकरीस लागली आहे.स्वतः अडाणी व अशिक्षित असलेल्या आई-वडिलांच्या मेहनतीला फळ मिळाले असून दोघां बहिण-भावाने एक आदर्श निर्माण केला आहे.

 शहरातील रहिवाशी हणमल्लू सायन्ना तोंदरोड(वडिल),म्हादाबाई हणमल्लू तोंदरोड(आई) ह्या दोघा  नवरा-बायकोस दोन मुले व एक मुलगी असे तिन अपत्य.घरात जवळपास पाच व्यक्तीं,जेमतेम शेती,एवढ्या शेती मध्ये आपण आपले लेकर काय खाणार,शेतात काय पिकवतील व काय खातील,लेकरांना लहानच मोठ कसा करायचा,शेती पुरणार नाही.आमच्यासमोर असे अनेक प्रश्न उभे होते.आम्ही तर शिकलो नाही.पण आपल्या लेकरांना काहीही करायच पण शिकवायच अस पक्क ठरवल.आर्थिक,शारिरीक,मानसिक अश्या अनेक संकटांना तोंड दिले.मुलगी भाग्यश्री,मुलगा नागेश हे दोन्ही बहिण-भाऊ सतत अभ्यास करुन परिक्षा देऊन तलाटी झालेत.मुलगी सन २०१४ ला ग्रामसेवक म्हणून लागली होती.नंतर २०१५ ला तलाटीची परिक्षा पास होऊन सध्या कोल्हापूर जिल्ह्यात तलाटी म्हणून कार्यरत आहे.तर सन २०२३ ला तलाटीच्या परिक्षेत १५९ गुण घेऊन मुलगा नागेश हि तलाटी झाला.मोठा मुलगा नितेश याने सुध्दा पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.मेहनत करुन मुलांना लहानाच मोठ करुन,शिकवून घडविले अशी माहिती नागेशच्या आई-वडिलांनी सांगितली.

 लहानपणापासूनच आई-वडिलांनी आम्हा बहिन-भावांच्या  शिक्षणावर भर दिला.शिक्षणच आयुष्यात कलाटणी देऊ शकते.हे संस्कार दिले.यामुळे शिक्षणाची गोडी वाढली.चांगल्या शिक्षकांमुळे गोडी वृध्दींगत झाली.नागेशचे ईयत्ता १ ते ७ वी पर्यंतचे  शिक्षण कन्या शाळा,ईयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण साने गुरुजी शाळेत,ईयत्ता ११ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण पानसरे महाविद्यालयात तर पदवीचे शिक्षण नांयगाव येथे झाले.स्पर्धा परिक्षेशिवाय दुसरा कोणताच पर्याय समोर नव्हता.तसेच बहिणीचा स्पर्धा परिक्षेचा अनुभव व मार्गदर्शन घेत मी  तयारी करत होतो.रेल्वे,वनविभागाच्या परिक्षेत अर्धा ते एक गुणांमुळे अपयश आले.मी पुन्हा अभ्यास करुन यश मिळविले अशी माहिती नागेश ने दिली.स्पर्धा परिक्षेत नितेश तोंदरोड ने चांगले गुण घेऊन घवघवीत यश संपादन करुन तलाटी पदासाठी त्याची निवड झाल्याबद्दल नितेश तोंदरोड व मिञमंडळाडून व माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार आदिंनी त्याचा सत्कार केला.


आज मी तलाटी या पदावर पोहचलो ते फक्त माझ्या आई-वडिलांच्या अथक परिश्रम,आशिर्वाद,भरीव योगदानामुळेच आहे.माझ्यासाठी माझे आई-वडिल,बहिण-भाऊ,कुटूंबाचे सदस्य माझी ताकद आहे.मी पुढे यावरच न थांबता युपीएससी,एमपीएससी च्या स्पर्धा परिक्षेची तयारी व अभ्यास करणार आहे.ध्येय समोर ठेवले आणि परिश्रम केले तर यश निश्चित मिळते.

नागेश हणमल्लू तोंदरोड

टिप्पण्या