नांदेड : तब्बल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लांचे पुन्हा एकदा अयोध्या नगरीतील राम मंदिरात आगमन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमातून येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरात दिवाळी साजरी करावी. देव्हाऱ्यात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची आणि गावातील प्रत्येक मंदिरावर प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची अथवा प्रतिमेची पूजा करावी. शोभायात्रा काढाव्यात. भगवे ध्वज फडकवावेत असे आवाहन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले .
खासदार चिखलीकर यांच्या साई सुभाष या संपर्क कार्यालयात आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी , माध्यम प्रतिनिधी यांना रामज्योतींचे वाटप करण्यात आले .यावेळी ते जनतेशी आणि माध्यमांशी संवाद साधत होते.
रामज्योतींचे वाटप करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील. प्रत्येकाच्या घरी रामज्योती पोहोचण्यासाठी पुढाकार घेतील असा विश्वासही खासदार चिखलीकर यांनी व्यक्त केला यावेळी.
यावेळी - खा प्रतापराव पाटील चिखलीकर, धर्मराज देशमुख, राजेश कुंटूरकर, मिलींद देशमुख, सौ.प्रणिताताई देवरे, गंगाधराव जोशी, बालाजीराव बचेवार, बाळू खोमने, दिपकसिंह रावत, विनय सगर,, लक्ष्मणराव इंगोले रविंद्र पोतगंटीवार, प्रविण साले, विजय गंभीरे, बालाजी पाटील कासरखेडकर, लक्ष्मणराव ठक्करवाड सुशिल चव्हाण, सौ.औरादकर, व सर्व तालुका प्रमुख व भाजपा पदाशिकारी व सर्व पत्रकार मंडळी या वेळी उपस्थित होते

addComments
टिप्पणी पोस्ट करा