नांदेड:( दि. २७ जानेवारी २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्य डॉ. हंसराज जाधव, प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण यांनी वरील उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर होते. प्रमुख उपस्थिती संस्थेचे कार्यकारणी सदस्य नरेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यकारणी सदस्य पांडुरंगराव पावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय जगताप यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ.विश्वाधार देशमुख यांनी करून दिला.डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
यशवंत महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात या कार्यक्रमात विचारमंचावरून डॉ.हंसराज जाधव बोलत होते. श्रद्धेय डॉ. शंकरावजी चव्हाण यांच्या गौरवशाली कामाचे स्मरण आपण ठेवले पाहिजे; असे ते म्हणाले.सर्वसामान्य माणसासाठी काम करण्याच्या पद्धतीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. श्रद्धेय शंकराव चव्हाण यांनी शेती आणि माणसासाठी जो वसा आणि वारसा जोपासला आहे; तो खऱ्या अर्थाने यशवंत महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी अंगिकारावा, असेही असे ते म्हणाले. वाणी आणि पाणी या दोन्ही गोष्टीची सामर्थ्य त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आपल्या सुंदर अशा शाहिरी काव्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले .
या प्रसंगी उन्हाळी २०२३ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयातून प्रथम आलेल्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला तसेच महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशाची उंच उंच शिखरे गाठावीत, असे मार्गदर्शन केले .
त्याचबरोबर श्री. नरेंद्र चव्हाण यांनी, मराठी भाषा आणि विद्यार्थी व त्यांचा अभ्यास याबद्दल अतिशय अमूल्य अशा प्रकारचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, प्रबंधक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ. अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.
याप्रसंगी यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापक, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा