दिनांक 15/09/2023 रोजी तक्रारदार पुरूष, वय 26 वर्षे यांचे तक्रारीवरून आरोपी ईतर लोकसेवक 1) सुनिलदत्त विठ्ठलराव खिराडे, वय 52 वर्षे, सहशिक्षक, लोकमान्य प्राथमिक शाळा, कंधार, ता. कंधार, जि. नांदेड यांनी 2) बळीराम बालाजी पवार, वय 42 वर्षे, संस्था अध्यक्ष, भारती शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड, रा. मुक्ताई नगर, कंधार, ता. कंधार, जि. नांदेड यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचे निलंबन कालावधीतील वेतन काढून देण्यासाठी चौकशी दरम्यान तक्रारदार यांना पाहिजे तशी मदत करण्यासाठी व येणा-या एक तारखेला निलंबन बहाल करून शाळेवर रूजु करून घेण्याकरिता पंचासमक्ष 2,00,000/- रूपये लाचेची मागणी व निलंबन कालावधीतील अर्ध्या पगाराची मागणी करून दि. 15/09/2023 रोजी 18ः15 वाजण्याचे सुमारास स्विकारून स्वतःचा व संस्थाअध्यक्ष पवार यांचा आर्थिक फायदा करून देण्याकरिता अनुचित गैरलाभ मिळविला म्हणून वर नमूद दोघांविरूध्द पो.स्टे. कंधार, जि. नांदेड येथे गुरनं 283/2023 कलम 7, 7 अ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा नोंद करून सहशिक्षक सुनिलदत्त विठ्ठलराव खिराडे, लोकमान्य प्राथमिक शाळा, कंधार, ता. कंधार, जि. नांदेड यांना नमुद गुन्हयात अटक करून तपास करण्यात आला.
सदर गुन्हयातील दुसरे आरोपी बळीराम बालाजी पवार, वय 42 वर्षे, संस्था चालक, भारती शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड, रा. मुक्ताई नगर, कंधार, ता. कंधार, जि. नांदेड यांनी अटकपूर्व जामीन मिळणेकामी मा. जिल्हा व अपर सत्र न्यायालय, नांदेड व त्यानंतर मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी आरोपीची जामीन मंजुर होवू नये म्हणून भक्कम दाखले देत आपले म्हणणे सादर केले. त्यामुळे नमूद आरोपीची मा.जिल्हा व अपर सत्र न्यायालय, नांदेड येथून जामीन नामंजूर झाला. त्यानंतर आरोपीने मा. उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर येथे जामीन मिळणे कामी अर्ज केला परंतु तेथेही लाचलुचपत प्रतिबंध विभाग नांदेडने दाखल केलेले म्हणणे मा. न्यायालयाने ग्राह्य धरून दिनांक 22/01/2024 रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
आरोपीस दि. 24/01/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडचे पथकाकडून अटक करण्यात आली.
आज रोजी अटक आरोपीस मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायालय, कंधार, जि. नांदेड यांचे न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायाधीश यांनी *संस्था अध्यक्ष आरोपी बळीराम बालाजी पवार, वय 42 वर्षे, भारती शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड यांची दि. 29/01/2024 पर्यंत (05) दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.* सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
*लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास खालील क्रंमाकावर संपर्क करावा.*
*1) टोलफ्री हेल्पलाईन क्रंमाक:-1064*
*02) कार्यालयाचा फोन क्रंमाक 02462-253512*
*3) डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड. मो.नं. 9623999944*
*4) श्री राजेंद्र पाटील, पो.उप अधि., ला.प्र.वि. नांदेड, मोबाईल क्रंमाक 7350197197*
addComments
टिप्पणी पोस्ट करा