लोणावळा येथील न्युसी रिसॉर्ट मध्ये भारतातील जवळजवळ २४ न्युसी शाखा कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी १९ व २० जानेवारी २०२४ रोजी न्युसिचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या शिबिरात २०२४ मध्ये सर्व शाखा कार्यालयासाठी युनियनचे नवीन ध्येय काय असेल, यावर दोन दिवस फलदायी चर्चा झाली. युनियनचे उपाध्यक्ष लुईस गोम्स यांनी सर्वांचे स्वागत केले. न्युसिचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी २०२४ मध्ये युनियनची ध्येयधोरणे काय असतील, कामगार प्रशिक्षण व कल्याणकारी योजना याबाबत प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले. दोन दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरात कार्यकारी समिती, शाखा प्रतीनिधी, महिला समिती, युवक समिती यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. न्युसीची ऑनलाईन सभासद संख्या करण्याबाबत नासिर खान व अरविंद मोहिते यांनी सर्व शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. कामगार कायदे प्रसिद्धी माध्यम व निर्मिती या विषयावर सर्वश्री. कुणाल गायकवाड, मारुती विश्वासराव, महेंद्र परब यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींसाठी प्रश्नोत्तरेचा कार्यक्रम झाला. दोन दिवसाच्या शिबिरात न्युसिचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील नायर यांनी सुंदर निवेदन केले. प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी युनियनचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी सुरेश सोळंकी, असिस्टंट सेक्रेटरी सलीम झगडे, पी. आर. ओ. सुंदर, अभिलाषा सोनवणे, कार्यकारी समिती, शाखा प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. न्युसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांच्या अधिपत्याखाली लोणावळा येथील न्युसी रिसॉर्टमध्ये नाविक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी न्युसी रिसॉर्ट पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा