शाळा विद्यार्थ्यांना घडवणारे मंदिर - गजानन देशमुख

नूतनचे स्नेहसंमेलन 'नवी उमेद' चे जल्लोषात उद्घाटन

सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या सांस्कृतिक - क्रीडा स्पर्धा ' नवी उमेद - २०२४ ' वार्षिक स्नेहसंमेलनाचे उध्दघाटन झी चोवीस तासचे परभणी- हिंगोलीचे जिल्हा प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून सोमवार ( दि. ०१ ) जानेवारी रोजी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे पर्यवेक्षक किरण देशपांडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथकाच्या प्रमुख अस्मिता मोरे या होत्या. मंचावर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आरती पांडव, प्रा. नागेश कान्हेकर, सतीश नावाडे, पर्यवेक्षक देवीदास सोन्नेकर यांची उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाचे उध्दघाटक गजानन देशमुख म्हणाले की, ' शाळा हे विद्यार्थ्यांना घडवणारे मंदिर आहे. शालेय जीवन हे खुप महत्वाचे असते. शिक्षण हे नागरिक घडवण्याचे काम करते. स्नेह संमेलनातील विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. या कला, क्रीडा स्पर्धेतून करीयरच्या संधीही उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्यातील आत्मविश्वासाने यशस्वी वाटचाल करावी.' असे प्रतिपादन गजानन देशमुख यांनी केले. प्रमुख पाहुणे अस्मिता मोरे यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना सदमार्गाने जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले. सच्चिदानंद डाखोरे आणि विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. सुत्रसंचलन शिल्पा बरडे, अनुजा सुभेदार यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश माळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश हिवाळे, प्रशांत नाईक, भगवान देवकते, बाळू बुधवंत, संध्या फुलपगार, आदिती आंबेकर, अश्विनी पटाईत, मिरा शेटे, क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला



सेलू : येथील नूतन विद्यालयाचे स्नेहसंमेलन 'नवी उमेद'चे उद्घाटन झी चोवीस तासचे परभणी-हिंगोलीचे जिल्हा प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले. याप्रसंगी दामिनी पथकाच्या प्रमुख अस्मिता मोरे, आरती पांडव, सतीश नावडे पर्यवेक्षक किरण देशपांडे देविदास सोन्नेकर, प्रा. नागेश कान्हेकर, गणेश माळवे, सुरेश हिवाळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, शिल्पा बरडे, अनुजा सुभेदार, संध्या फुलपगार, क्षीरसागर आदी.

टिप्पण्या