मुंबई पोर्ट प्राधिकरण, गोदी विभागातील , *लेबर सुपरवायझर्स व इन्स्पेक्टर्स* या कॅटगरीची
फिलॅन्थ्रोपिक फाऊंडेशन ऑफ डाॅक लेबर सुपरवायझरी स्टाफ ही संस्था सभासदांच्या सर्वंगीण विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेने नुकतेच ४५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेने १७ डिसेंबर २०२३ रोजी "पेन्शनर्स डे" या दिनाचे औचित्य साधुन फाऊंडेशनच्या सर्व सभासदांचा स्नेहमेळावा वडाळा येथील रेनॉल्ड रोड इन्स्टिट्यूट हॉल आयोजित केला होता.
संस्थेचे ९०% सभासद सेवा निवृत्त झाले आहेत. त्यामुळे
केवळ एकमेकांना भेटणे आणि पुढील तीन तास आनंदात घालवून, जुन्या आठवणींना उजाळा देणे व पुढील वर्षभरासाठी एक वेगळी ऊर्जा सोबत घेऊन जाणे हा कार्यक्रमाचा उद्देश ठरवून कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली होती.
कार्यकारी समितीने कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी फिलॅन्थ्रोपिक फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष प्रदीप गोलतकर व माजी जनरल सेक्रेटरी विजय सोमा सावंत यांच्यावर सोपविली होती. विजय सोमा सावंत यांनी देखील आपला सांस्कृतिक क्षेत्रातील अनुभव पूर्ण पणाला लावून, कार्यक्रमाचे स्थान, सजावट, मंडप व्यवस्था, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक, भोजन व्यवस्था व सांस्कृतिक कार्यक्रम ठरवून एकुणच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची भुमिका पार पाडली. तसेच प्रत्येक सभासदाशी थेट संवाद साधुन प्रत्येकाला कार्यक्रमस्थळी येण्यास प्रवृत्त केले.
कार्यकारी समिती, प्रदीप गोलतकर व विजय सोमा सावंत यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत स्नेह मेळाव्यास आजी माजी सभासद विशेषता सेवानिवृत्त होऊन जे सभासद, सेवा निवृत्ती नंतर आपआपल्या गांवी स्थायिक झालेले आहेत, असे सभासद संमेलनास आवर्जुन उपस्थित राहून, जणू अशाच मेळाव्याची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो असाच संदेश दिला आहे. बर्याच वर्षानी आपल्या सहकार्यांना पाहुन प्रत्येकांचे मन भरुन आले होते. "*कहाॅ गये वो दिन*" असेच म्हणत प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करीत होता. काहींनी तर बर्याच वर्षांनी भेट झाल्यामुळे भावना अनावर होऊन अश्रुवाटे मोकळ्या केल्या. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वजण आठवणीत रममाण झाले होते. सुख दुःखाच्या भुतकाळातील आठवणींना उजाळा देत भविष्याचा वेध घेत, पुन्हा पुन्हा भेटण्याची आश्वासनाची खैरात चालु होती. एकंदर त्यादिवसाची संध्याकाळ म्हणजे सर्वांसाठी "आनंदाचे डोही आनंद तरंग " अशी झाली होती.
दुरवरुन आलेल्या सभासदांचा प्रवासाचा क्षीण दुर करण्यासाठी हरहुन्नरी सभासद शिर्के व राऊळ यांनी गरम गरम चहा देऊन सर्वांचे स्वागत करत होते. त्यामुळे प्रवासाचा क्षीण दूर होऊन, ताजेतवाने होऊन सभासद सभागृहात प्रवेश करीत होते.
कार्यक्रमाच्या अंतर्गत शाकाहारी व मांसाहारी भोजनाचीही उत्तम व्यवस्था तसेच या भोजनाचा आस्वाद घेता घेता सुरेल गायनाचा कार्यक्रम ऐकण्याची संधीही उपलब्ध होतीच तसेच, सहकार्यांशी गप्पाष्ठकांचा कार्यक्रम करुन सर्वांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय सोमा सावंत, प्रदीप श्रीधर गोलतकर, अरुण वचकल तसेच विद्यमान कार्यकारणी सदस्य अध्यक्ष राजीव लक्ष्मण सावबा, उपाध्यक्ष सुनिल राजाराम शिर्के,जन. सेक्रेटरी विष्णू प्रभाकर सस्ते, ऑर्गर्नायझिंग सेक्रेटरी चंद्रराव कनकटाला, खजिनदार चंद्रशेखर महादेव राऊळ, सह खजिनदार लक्ष्मीकांत पुरुषोत्तम जांगडे या सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याला विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मारुती विश्वासराव, दत्ता खेसे, सुर्यकांत शिंदे इत्यादीनीं भेट देऊन संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली.
पुन्हा पुन्हा असेच भेटू व रिचार्ज होऊ अशी भावना व्यक्त करीत, प्रत्येकाने एकमेकांचा जड पावलांनी निरोप घेतला.
एकंदर कार्यक्रमाची यशस्वी सांगता, एकमेकांना साह्य करुन, सर्वांनी अवघा सुपंथाचा मार्ग स्विकारल्याने कार्यक्रम न भुतो अशा प्रकारे यशस्वी झाला.
मारुती विश्वासराव
सानपाडा, नवी मुंबई
addComments
टिप्पणी पोस्ट करा