मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राजेंद्र खोपडे सेवानिवृत्त*


मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील शेड सुप्रिटेंडेन्ट व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे कमिटी मेंबर श्री. राजेंद्र खोपडे हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्या निमित्ताने साई कृपा सेवा फंड व सेवाभाव १९८७ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०२३ रोजी वरळी येथील पोर्ट ट्रस्ट वसाहतीच्या पटांगणात राजेंद्र खोपडे यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न झाला. 

या सत्कार सोहळ्यात माजी परिवहन मंत्री व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माननीय श्री दिवाकर रावते, मुंबईच्या माजी महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर, युनियनचे चिटणीस व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे असिस्टंट ट्राफिक मॅनेजर गणेश जाधव, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, माजी कार्याध्यक्ष संजय माधव, स्थानीय आत्मकथन सबदिबाबा संघाचे जी. एस. परब, प्रकाश खोपडे इत्यादी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सत्काराला उत्तर सत्कारमूर्ती राजेंद्र खोपडे यांनी दिले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने व इतर संस्थांच्या वतीने राजेंद्र खोपडे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते सर्वश्री विजय चोरगे, रमेश गुरव, अशोक खताळ, विजय गुरव, हरिभाऊ फलके,रमेश पवार,प्रशांत थोरात, सरोदे, इत्यादींनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहितीपट दिग्दर्शक व निर्माते विजय सोमा सावंत यांनी केले.

आपला 

मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज