- टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र राज्य संघा सोबत भाजपा शहराध्यक्ष महेंद्र धर्मा पाटील व सौ.अनघा पाटील मॅडम, मुंबई विभागीय सचिव अशोक शिंदे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल घुगे, संदिप भोसले, राज सोनपसारे ,सौ. योगिता भोसले मॅडम.*केरळ येथील राष्ट्रीय मिनी/युथ टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धा साठी राज्य संघ रवाना*
परभणी:- टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन च्या मान्यतेने ठाणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने दि. २५ ते २७ डिसेंबर दरम्यान डोंबिवली येथे राष्ट्रीय स्पर्धा पुर्वप्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. यातून महाराष्ट्र राज्य मिनी व युथ टेनिस व्हॉलीबॉल संघ दि. २८ ते ३० डिसेंबर दरम्यान कोझिकोडे (केरळ ) येथे सहभागी होणार आहे. अशी माहिती राज्य सचिव गणेश माळवे यांनी दिली.
राज्य संघास भाजपा शहराध्यक्ष महेंद्र धर्मा पाटील व सौ.अनघा पाटील मॅडम यांच्या हस्ते ट्रॅकसुट व किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुंबई विभागीय सचिव अशोक शिंदे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल घुगे, संदिप भोसले, राज सोनपसारे ,सौ. योगिता भोसले मॅडम आदी उपस्थित होते .
युथ गट मुले:-
अवनिश राजेंद्रप्रसाद यादव(ठाणे) , हेमंत अजय श्रीवास (मुंबई उपनगर)
अविनाश अशोक जाधव(लातूर)
आयुष दिपक परियार (ठाणे)
आयुष सुंदरलाल नगले(नाशिक) कार्तिक केशव साखरे (बीड)
प्रशिक्षक: अनिल घुगे (ठाणे)संघ व्यवस्थापक: अशोक शिंदे (मुंबई)
युथ गट मुली:-
स्नेहा शरद थावरे(बीड),अंकिता राम जाधव(बीड), अंजली सुनिल गुप्ता(मुंबई), साक्षी हरेश महाडीक (मुंबई) ,साक्षी सुनिल गोसावी (परभणी) ,इशा शिवराजन ओडियार (मुंबई)
प्रशिक्षक:- निनांत राहटे (उपनगर मुंबई)सौ.नेहा बन्सोड (पुणे)
मिनी गट मुले :-
प्रशांत बुद्धीराज सिरसट (बीड) विवेक बिभास सिंग (ठाणे)
गौरव दिनेश येरावार(पुणे) स्नेहाशिस मधुकर खंदारे (हिंगोली) इश्वर महेंद्र मोरे(पुणे) ,आदित्य लालबहादूर सिंग(ठाणे)
प्रशिक्षक: संदिप भोसले (पुणे)
मिनी गट मुली
अक्षरा बाबासाहेब पवार (बीड) सोमेश्वरी राजेश टाक (बीड),श्रेया संतोष ढवान (पुणे),श्रृष्टी श्रीकांत शिंदे (सांगली),वैष्णवी राजेश माने(सांगली), तनुजा अनिल रांजणे(पुणे)
प्रशिक्षक: राजकुमार सोनपसारे (बीड)
मिनी मिक्स डबल:- सायली मुकुंद बाठे व राजवीर संदिप भोसले (पुणे)
युथ मिक्स डबल:-अभिषेक गौतम साळवे (परभणी)प्रतिक्षा संतोष जाधव(मुंबई)
महाराष्ट्र राज्य संघास खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, चेअरमन गणपतराव बालवडकर, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, राज्य कोषाध्यक्ष डॉ. दिनेश शिगारम, उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार देशपांडे, डॉ. आबासाहेब सिरसाठ, अजिंक्य वाघ, मिलिंद कुलकर्णी, आदी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा