नवी मुंबई वाशी येथे मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त संगीत पर्वणी*


संगीत क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे महान गायक, स्वर्गवासी मोहम्मद रफी साहेबांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त, 99 @ रफी साहब हॅपी बर्थडे, हा दर्जेदार कार्यक्रम, २३ डिसेंबर २०२३ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात, वेदांत क्रिएशन्स व टॅलेंट बॉक्स एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमान संपन्न झाला. अतिशय उत्कृष्ट आयोजन व संयोजन तसेच रफी साहेबांचा आवाज म्हणून परिचित असलेले कलाकार वैभव वशिष्ठ, अली हुसेन, अमोल चव्हाण या मातब्बर गायकांना साथ करणारी सुरेल धनश्री देशपांडे आणि निवेदक आर.जे.अमित यांच्यामुळे हा कार्यक्रम रफी साहेबांच्या चाहत्यांना गाण्यांची मेजवानी देऊन गेला. संगीतकार देवा बंगेरा व उमा देवराज यांच्यासोबत असलेल्या दहा वादकांमुळे या कार्यक्रमाला एक उच्च दर्जा प्राप्त झाला. अगदी संपूच नये असे वाटत राहणाऱ्या या संगीत पर्वणीत, रफी साहेबांची कायम स्मरणात राहणारी गाणी या कार्यक्रमात अतिशय उत्कृष्टपणे सादर करण्यात आली. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिध्दी प्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांना दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर संघाच्या वतीने पत्रकार क्षेत्रातील मानाचा आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल त्यांचा पनवेल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, कार्यक्रमाचे आयोजक विजय सोमा सावंत आणि किशोर सावंत(भोसले) यांच्या हस्ते शाल व सन्मान पत्र देऊन जाहिर सत्कार करण्यात आला.

रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाची संधी, पुन्हा एकदा शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर रोजी, रात्रौ ८.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे, रसिकांना मिळणार आहे.

आपला

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या