माहूरचे वन परीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी केलेल्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा



* वन संरक्षक छ.संभाजी नगर यांचे चे उप वन संरक्षकांना निर्देश

       राम दातीर 

माहूर (प्रतिनिधी ) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड तालुका सचिव तथा सीटू कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी माहूर परीक्षेत्राचे वन परीक्षेत्र अधिकारी श्री रोहित जाधव यांनी केलेल्या बोगस कामाची व कामे न करता बिले उचलून अपहार केल्याची तक्रार जिल्हाधिकारी नांदेड व राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी आणि वन मंत्र्याकडे केली होती.

विभागीय समिती मार्फत चौकशी करून त्यांना सेवेतून बदतर्फ करावे या मागणी साठी माकप,जमसं आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर अखंड पन्नास दिवस साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन केले होते.सीटू संलग्न वन कामगार युनियन जिल्ह्यात कार्यरत असून त्या संघटनेचे काम कॉ.गायकवाड हेच पाहतात. सीटू युनियनच्या वतीने वन विभागाच्या मुख्य कार्यालयावर अनेक आंदोलने देखील केली आहेत.

शहरात आणि शहरालगत चालणाऱ्या आरा मशीन व विविध फर्निचर मार्ट संदर्भात देखील गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत.

माहितीच्या अधिकारातील प्राप्त केलेल्या माहिती नुसार वनपरीक्षेत्र अधिकारी जाधव यांनी माहूर परीक्षेत्रात अनेक गावामध्ये विविध कामे केल्याचे दिसून येत आहे,मात्र प्रत्यक्षात जायमोक्यावर पाहणी केल्यास त्या ठिकाणी काम केल्याचे दिसून येत नाही.अर्थातच तेथे कामे न करता लाखो रुपये उचलून शासकीय निधीचा अपहार केला आहे असे निवेदन कॉ. गायकवाड यांनी दिले होते.

माकपच्या त्या निवेदनाची दखल श्री एच.जी.धुमाळ वन संरक्षक छत्रपती संभाजी नगर यांनी घेत नांदेडचे उप वनसंरक्षक श्री केशव वाबळे यांना चौकशी करून अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात दिले आहेत. तसे लेखी पत्र वन संरक्षक (प्रादेशिक) छ.संभाजी नगर यांनी माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांना दि.२८नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक मेल द्वारे पाठविले आहे.

उप वनसंरक्षक केशव वाबळे काय कारवाई करतील आणि काय अहवाल वरिष्ठांना पाठवतील याकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लक्ष ठेऊन आहे.

तातडीने जायमोक्यावर प्रत्यक्षात पाहणी करावी आणि चौकशी करून वरिष्ठांना लवकरात लवकर अहवाल पाठवावा तसेच अहवालाची सत्य प्रत माकप तालुका कमिटीस देण्यात यावी या मागण्या घेऊन चिखलवाडी कॉर्नर नांदेड येथील उप वनसंरक्षक कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याचे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पण्या