माहूर ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन.आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची दाट शक्यता


      राम दातीर 

माहूर (प्रतिनिधि ) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील १८ वर्षांपासून आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी तत्वावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर नियमित सामावून घेण्याच्या मागणीसाठी माहूर ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे रुग्णांच्या आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

    कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.30 ऑक्टों.रोजी व्यवस्थापनास दिलेल्या निवेदनात मणिपूर, ओडिसा, पंजाब, राजस्थान, आंधप्रदेश व मध्यप्रदेश या राज्याप्रमाणे आम्हाला कायम करा, अशी मागणी केली आहे.तसेच यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने दिलेला आदेश न लागू केल्याने व सहा महिन्यांपुर्वी दिलेल्या आश्वासनाची आरोग्य मंत्र्यांनी पूर्तता केली नसल्याने कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.*राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या 20 पैकी 19 कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि.31 ऑक्टों.पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.अशी माहिती प्रशासकीय विभागाकडून मिळाली आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज