मुंबई दि.३१:आमचे पक्ष प्रमुख,तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घरांच्या प्रश्नावर एकादा नव्हे तर तीन-तीन वेळा बैठका लावल्या.सोडत काढून या प्रश्नाला चालना दिली.पण आजचे सरकार त्याच सोडतीत लागलेल्या चार-दोन घरांच्या चाव्या वाटप करीत आहे आणि वरून खूप काही केल्याचा आव आणीत आहे,अशी घणाघाती टीका शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी येथे बोलताना केली.
शिवसेना ठाकरे गट व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने
कोल्हापूर-गडहिंग्लज येथे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या औचित्याने पार पडलेल्या मेळाव्यात आमदार सचिन अहिर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.ग्रामीण भागातील शेतकऱ्यां पर्यंत शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचावे यासाठी हे प्रदर्शन मोलाचे ठरले आहे,अशी प्रशंसा करुन आमदार सचिन अहिर म्हणाले,
या पूर्वी बजेपीचे सरकार असतांना देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रकाश मेहता असतील गृहमंत्री,गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती असतांना एकाही गिरणी कामगारांला घर मिळवून दिलेले नाही.परतू आमच्या काळातील आघाडी सरकारने मु़ंबईतून हद्दपार झालेल्या जवळपास ३५ हजारावरील कामगारांना घरांचा हक्क प्राप्त करुन देऊन,
त्यांना सन्मानाने मुंबईत आणले आहे.त्यावेळी दीड लाखावर गिरणी कामगारांना घरे बांधली तर उद्या माथाडी किवा मापाडी घरे मागायला आले तर कसं शक्य आहे?असा प्रश्न केला गेला.पण गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून आम्ही सांगितले, गिरणी कामगारांचे स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान राहिले आहे.म्हाडाने आर्थिक भाराचा प्रश्न उपस्थित केला.पण मुंबई बॅंके कडून कर्ज घेऊन घरे बांधण्यात आली.मुबईतील गिरणी कामगार मानाने जगणारा आहे.तो कदापि एक पैसाही बुडविणार नाही.तसेच झाले.पण आर्थिक दृष्ट्या हलाखीचे जीवन जगणारा कर्जाचा हप्ता भरणार कसा?असा प्रश्नही निर्माण झाला. परंतु या कामगारांना घर भांड्याने देण्याची परवानगी आम्ही मागितली.पण आज हाच गिरणी कामगार अवघ्या ६.५० लाखांमध्ये ६०-७० लाख किंमतीच्या घराचा मालक झाला आहे,असेही कामगार नेते आमदार सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले.महाआघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एम एम आर डी ए अंतर्गत १७० एकर जमीन गिरणी कामगार घर बांधणीसाठी मिळवून दिली, याचाही सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
स्वागत आणि प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे,
संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगवले,उपजिल्हा प्रमुख दिलीप माने,श्रध्दा शिंत्रे,शहर प्रमुख संतोष चिकोडे, मुंबई राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खाजिनदार निवृत्ती देसाई यांदीची भाषणे झाली.••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा